ईशान आनंद यांची BSP राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती.
मायावतींकडून दुसऱ्या भाच्याला पद
वृत्तसंस्था, लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी बुधवारी पुन्हा एकदा चकित करणारा निर्णय घेत स्वत:चा छोटा भाचा ईशान आनंदला राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्त पेले आहे. यापूर्वी ही जबाबदारी मायावतींनी मोठा भाचा आकाश आनंदला दिली होती. काही दिवसांपूर्वी आकाश याला पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय मायावतींनी घेतला होता.
पुढील 6 महिन्यांमध्ये उत्तरप्रदेश आणि पंजाब समवेत अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याचमुळे मायावतींनी बुधवारी लखनौमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांसमोर ईशानने मायावतींच्या चरणांना स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. यानंतर ईशान यांना बैठकीत सतीश मिश्रा यांच्या तोडीचे स्थान मिळाले.
ईशान आतापर्यंत बसपमध्ये पडद्यामागे राहून डिजिटल मीडिया, युवा शाखा आणि तांत्रिक रणनीति सांभाळत होता. आता राष्ट्रीय स्तरावर संघटनेला मजबूत करण्याची जबाबदारी त्याला मिळाली आहे. मायावती मागील काही काळापासून ज्याप्रकारे स्वत:चे निर्णय बदलत आहेत, ते पाहता ईशानसाठी ही जबाबदारी सांभाळणे आव्हान ठरणार असल्याचे मानले जातेय. ईशान आता देशभरातील राज्यांचे प्रभारी आणि मुख्य समन्वयकांसोबत थेट संपर्कात राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मायावती यांच्याशी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाब्sात पक्षाला राष्ट्रीयस्तरावर विस्तार देण्याचे कामही त्याच्याकडेच असेल.
Comments are closed.