टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होताच ईशान किशनचा धमाका! 33 चेंडूत ठोकलं शतक

झारखंड विरुद्ध कर्नाटक विजय हजारे ट्रॉफी 2025 : इशान किशनने विजय हजारे ट्रॉफी 2025ची सुरुवात अगदी त्याच जबरदस्त फॉर्ममध्ये केली आहे, ज्या फॉर्ममध्ये त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा शेवट चॅम्पियन म्हणून केला होता. कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात इशानने अवघ्या 33 चेंडूमध्ये तुफानी शतक झळकावत इतिहास रचला. या कामगिरीसह तो लिस्ट ‘ए’ क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. काही तासांपूर्वीच वैभव सूर्यवंशीने 36 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, मात्र इशानने त्यालाही मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होताच ईशान किशनचा धमाका!

इशान किशनचा हा फॉर्म काही योगायोग नाही. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी 2025मध्ये त्याने 500 हून अधिक धावा करत सर्वाधिक धावसंख्या करणारा फलंदाज बनण्याचा मान मिळवला होता. त्याचबरोबर, त्याच्या नेतृत्वाखाली झारखंडने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती. या शानदार कामगिरीचे फळ म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन आणि टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या संघात निवड झाली. कर्नाटकविरुद्ध इशानने 39 चेंडूमध्ये 125 धावा ठोकल्या. या खेळीत 7 चौकार आणि 14 षटकार होते, ज्यामुळे प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले.

इशानच्या या स्फोटक खेळीपूर्वीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज सुरूवात केली होती. त्याने 84 चेंडूमध्ये 190 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली, ज्यात 16 चौकार आणि 15 षटकार मारले होते. या खेळीत वैभवने अनेक मोठे विक्रम मोडले. तो लिस्ट ‘ए’ क्रिकेटमधील सर्वात तरुण शतकवीर ठरला, तसेच एबी डिव्हिलियर्सचा सर्वात वेगवान 150 धावांचा जागतिक विक्रमही मोडला. काही तासांतच वेगवान शतकाच्या यादीत वैभव मागे पडला आणि इशान किशनने बाजी मारली.

झारखंडकडून कर्नाटकला 413 धावांचे आव्हान

इशान किशनच्या तुफानी खेळीच्या जोरावर झारखंडने 50 षटकांत 9 बाद 412 धावा केल्या. कर्नाटकसमोर विजयासाठी 413 धावांचे अवघड लक्ष्य ठेवण्यात आले आहे. इशानशिवाय विराट सिंगने 88, कुमार कुशाग्रने 63, तर सलामीवीर शिखर मोहनने 44 धावांचे योगदान देत झारखंडच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. विजय हजारे ट्रॉफी 2025 च्या पहिल्याच दिवसापासून भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये विक्रमी खेळींचा महापूर पाहायला मिळत आहे.

सर्व भारतीय खेळाडूंना लेस्ट ए सेंच्युरी stest scentes scente परवडणारे होते

  • 33 चेंडू – इशान किशन, झारखंड वि. कर्नाटक (आज)
  • 35 चेंडू – अनमोलप्रीत सिंग, पंजाब वि. अरुणाचल प्रदेश, 2024
  • 36 चेंडू – वैभव सूर्यवंशी, बिहार वि. अरुणाचल प्रदेश (आज)
  • 40 चेंडू – युसूफ पठाण, बडोदा वि. महाराष्ट्र2010
  • 41 चेंडू – उर्विल पटेल, गुजरात वि. आंध्र प्रदेश, 2023

हे ही वाचा –

Vijay Hazare Trophy News : मोठी बातमी : क्रिकेटच्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड तुटले, 50 षटकात 574 धावा, वैभव सूर्यवंशीसह तिघांचं वादळी शतक

आणखी वाचा

Comments are closed.