ईशान किशनने गाठला मोठा टप्पा! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय

टीम इंडियाचा स्टार खेळाडू ईशान किशन (Ishaan kishan) सध्या आयसीसी क्रमवारीतील नंबर-1 टी-20 फलंदाज आहे. 2026 मध्ये त्याने फलंदाजीत केलेली शानदार कामगिरी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात ईशान किशनने 20 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली.

ईशान किशन आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील केवळ सातवा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. या विशेष यादीत ईशानचा समावेश झाला आहे. त्याच्यापूर्वी भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1 हजार किंवा त्याहून अधिक धावा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) केल्या होत्या.

दीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर ईशान किशनने 2026 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी आतापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 29 डावांमध्ये फलंदाजी करताना 37.22 च्या सरासरीने एकूण 1005 धावा केल्या आहेत.

यादरम्यान ईशानने एक शतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. यासह एका वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादवपाठोपाठ ईशान हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 1164 धावा केल्या होत्या.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1 हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारे खेळाडू :

करणबीर सिंग (ऑस्ट्रिया) – १४७२ धावा २०२५)
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) – 1326 धावा 2021)
फैज अहमद (बहारिन) – १२५१ धावा २०२५)
सूर्यकुमार यादव (भारत) – 1164 धावा (2022)
प्रशांत कुरुप (बहरीन) – 1037 धावा 2025)
बिलाल झाल्मी (ऑस्ट्रिया) – 1008 छापे (2025)
इशान किशन (भारत) – 1005* धवा 2026)

2026 मध्ये भारतीय संघाचे अजून काही टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. त्यामुळे ईशान किशनला सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडण्याची संधी आहे. हा विक्रम मोडण्यासाठी ईशानला आणखी 159 धावा कराव्या लागतील. त्यानंतर एका वर्षात भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.

Comments are closed.