इस्रायलमध्ये रेजिम चेंज होणार? अरब पक्ष 19 जागांसह ‘किंगमेकर’च्या भूमिकेत; नेतन्याहूंचा वोट चोरीचा आरोप
इस्रायलमध्ये सध्या निवडणुका सुरू असून मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सध्या मतमोजणी सुरू असून कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पक्षाला अरब पक्षांकडून चांगली लढत मिळत आहे. अरब पक्षांना 19 जागा मिळण्याचा अंदाज असून ते किंगमेकरच्या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे. नेतन्याहू यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी अरब पक्षांनी विरोधकांना सहकार्याची तयारी दर्शवल्याने इस्रायलमध्ये रेजिम चेंजचे संकेत मिळत आहेत.
प्राथमिक आकडेवारीनुसार, इस्रायलच्या संसदेत अरब पक्षांना मिळून 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाला 48 जागा मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही गटांची एकत्रित संख्या 67 होते. सरकार स्थापन करण्यासाठी 120 सदस्यांच्या संसदेत 61 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे अरब पक्षांच्या पाठिंब्यामुळे नेतन्याहू यांना सत्तेबाहेर ठेवण्याचा विरोधकांचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Comments are closed.