नेतन्याहू यांना कर्करोगाचे निदान
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना कर्करोग असल्याचे निदान झाले असून त्यांनी स्वतःच ‘एक्स’ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. जेरुसलेम येथील हदासाह रुग्णालयात घेतलेल्या उपचारांनंतर आता त्या ट्युमरचा कोणताही अंश शिल्लक राहिलेला नसून मी आता पूर्णपणे निरोगी असल्याचे नेतन्याहू यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. इराणला इस्रायलविरुद्ध कोणताही खोटा प्रपोगंडा किंवा अपप्रचार करण्याची संधी मिळू नये म्हणून मी ही माहिती गोपनीय ठेवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.