विधान परिषदेच्या जागेसाठी करोडो रुपये देण्याची ऑफर; काहींनी अजितदादांचे जुने व्हिडीओ आणले समोर,

राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद निवडणूक 2026 उमेदवार: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (NCP Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेतील दहा जागांपैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेला येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या या एका जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पक्षाकडे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी परिस्थिती आहे. ही जागा आपल्या पदरात कशी पडेल, यासाठी इच्छुकांकडून सध्या वेगवेगळ्या क्लुपत्या लढवल्या जात आहे. सध्या अनेक इच्छुकानी आपण स्वत खासदार पार्थ पवार आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना न भेटता शिष्टमंडळाच्या माध्यमातून गळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही जणांकडून अजित पवारांनी जाहीर सभेच्या माध्यमातून दिलेल्या आश्वासनांचा व्हिडीओ समोर आणला जात आहे. तर काहींनी तर थेट सोशल मीडियात पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली आहे. हे ही नसे थोडके काही जणांनी तर थेट पक्षातील वरिष्ठांकडे पक्षनिधी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. तर काही जणाकडून जातीचा दाखला देत आत्तापर्यंत मराठा मुस्लिम समाजाला विधान परिषदेवर नेतृत्व देण्यात आलं. मग दलित समुदायाला का नाही? असा सवाल उपस्थित करताना एमएमडी फॅक्टर राबवण्याची मागणी केली आहे.

रुपाली ठोंबरेंचं पत्र लिहित संधी देण्याची मागणी- (NCP Vidhan Parishad Election Candidate 2026)

मागील काही दिवसांत उमेदवारिच्या मागणीसाठी सुनेत्रा पवार यांची भेट शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेणाऱ्यांमधे बुलढाणा जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, धाराशिव जिल्ह्याचे माजी अध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सुरेखा ठाकरे यांचा समावेश आहे. सुरेश बिराजदार यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन थेट अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी प्रचाराच्या निमित्ताने विधानपरिषदेवर घेण्याचा दिलेला शब्द याची आठवण करून दिली आहे. रुपाली ठोंबरे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्र लिहित संधी देण्याची मागणी केली आहे.

माजी खासदार यांच्या चिरंजीवाने करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली- (NCP Vidhan Parishad Election 2026)

सूत्रांच्या माहितीनुसार पक्षनिधीच्या नावाखाली पक्षातील एक माजी आमदार आणि पुण्यातील उदयोपती आणि माजी खासदार यांच्या चिरंजीवाने करोडो रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्यावतीने मराठा मुस्लिम समाजाला नेतृत्व देताना राजेश विटेकर, संजय खोडके आणि इद्रिस नायकवडी यांना संधी देण्यात आली. मग दलित समुदायाला का नाही असा सवाल उपस्थित करताना एमएमडी फॅक्टर राबवण्याची मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या जवळच्या मंडळींना संधी मिळावी यासाठी अनिकेत तटकरे, झिशान सिद्धकी आणि राजेंद्र जैन यांची नावे देखील पुढे करण्यात येत आहेत. आता सुनेत्रा पवार नेमकी कुणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा- (Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. (BJP Shivsena NCP Candidate List Vidhan Parishad Election 2026)

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
  • नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  • शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
  • अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
  • गोपीचंद पडळकर (भाजप)
  • रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  • राजेश राठोड (काँग्रेस)
  • प्रवीण दटके (भाजप)
  • रमेश कराड (भाजप)

विधान परिषदेची पोटनिवडणूक- (Vidhan Parishad Byelection 2026)

  • प्रज्ञा सातव

विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम- (Maharashtra Vidhan Parishad Election 2026)

  • निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
  • उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
  • उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
  • मतदानाची तारीख: 12 मे 2026
  • मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
  • मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026

संबंधित बातमी:

Maharashtra Vidhan Parishad Election 2026: भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत…विधान परिषदेच्या 10 जागांसाठी कुणाकुणाची नावं चर्चेत; संपूर्ण यादी!

आणखी वाचा

Comments are closed.