‘दिघे साहेब असते तर कानाखाली…’, संजय निरुपम मनसे राड्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, म्हण
मुंबई : राज्यात 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य (Marathi Language) करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता (Marathi Mandatory For Auto Taxi Driver) येते का, याबाबतची पडताळणी केली जाणार असून मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिला आहे. (Marathi Language Taxi And Rickshaw)
सरकारच्या या निर्णयानंतर सरकारमधील शिवसेना शिंदे गटातील नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच संजय निरुपम यांनी देखील दहीसरमधील रिक्षा चालकांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची घोषणा देत संजय निरुपम यांच्या कारची हवा सोडली, त्यांच्या गाडीवर बाटली फेकून मारल्याने चांगलाच गोंधळ उडाल्याचं दिसून होता. त्यानंतर पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि वातावरण शांत केलं. या सगळ्या प्रकरणावर आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Marathi Mandatory For Auto Taxi Driver)
संदीप देशपांडे : ते म्हणतात आम्ही शिकवायला तयार आहोत.
याबाबत बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं की, पोलिस बायस आहेत, त्यात वाद नाही. मराठी पोलीस भैय्या निरुपम यांना का सपोर्ट करत आहेत माहिती नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आहे. मराठी मुलांना जेलमध्ये टाकत भैय्या निरुपमला सपोर्ट करणारे कुठले सरकार आहे. आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार आहे का? हा प्रश्न आता आहे. जोर जबरदस्ती कराल तर उद्रेक होईल. आमच्यावर केसेस दाखल करत दाबण्याचा प्रयत्न केला, तर चुकीचं ठरेल. किती वर्ष प्रेमाने सांगायचं. १९६० पासून प्रेमाने सांगायचे, मूळात विषय असा आहे, उत्तर भारतीय रिक्षा चालकांना आमची लोकं भेटले. ते म्हणतायत आम्ही शिकायला तयार आहे. मग संजय निरुपमला काय अडचण आहे. शशांक राव आणि निरुपम यांना अडचणी आहेत, असंही पुढे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
Sandeep Deshpande : मराठी बऱ्याच लोकांना येते, शशांक राव यांना प्राॅब्लेम काय…
डीसीपी यांनी सांगितलं निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला बघायचं आहे, मुंबई बंद करण्याची ताकद भैय्यांमध्ये आहे का? मराठी बऱ्याच लोकांना येते, शशांक राव यांना प्राॅब्लेम काय आहे. अटक वगैरे आम्हालाच करतात, मात्र निरुपम वगैरे यांना सूट दिली आहे. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. दिघे साहेब असते तर निरुपम यांच्या कानाखाली मारली असती. तेच एकनाथ शिंदे यांनी करावं ही अपेक्षा आहे.
आणखी वाचा
Comments are closed.