आम्हाला घरी पोहोचवा…इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धात IPL मधील दिग्गज खेळाडू यूएईमध्ये अडकला,

इस्रायल विरुद्ध इराण युद्ध जॉनी बेअरस्टो: मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही (Israel vs Iran War) प्रत्युत्तर दिलं आहे. या हल्ल्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलदेखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला केला. त्यात अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसला आहे. जगभरातील हजारो विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. हवाई हद्द अचानक बंद झाल्यामुळे शेकडो उड्डाणांवर परिणाम झाला. दरम्यान, इराणने दुबईतील काही ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामध्ये दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही समावेश आहे. सध्या दुबईतील सर्व हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांसह अभिनेते, खेळाडू, भारतीय नागरिक दुबईमध्ये अडकले आहेत. याचदरम्यान, आयपीएलमधील दिग्गज खेळाडू आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) देखील दुबईत अडकल्याची माहिती समोर आली आहे. (Jonny Bairstow stuck in Dubai)

जॉनी बेअरस्टो दुबईत अडकला, काय म्हणाला? (Jonny Bairstow stuck in Dubai)

मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी तणावाचा परिणाम आता क्रिकेटवर स्पष्टपणे दिसून येत आहे. 1 मार्च रोजी होणारा पाकिस्तान शाहीन आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील दुसरा 50 षटकांचा सामना रद्द करण्यात आला आहे. बिघडत्या सुरक्षा परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, माजी आयपीएल खेळाडू जॉनी बेअरस्टोने युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याकडे मागणी केली आहे. जॉनी बेअरस्टो सध्या इंग्लंड लायन्ससोबत अबू धाबी (यूएई) मध्ये आहे आणि संघासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत जॉनी संघाच्या सुरक्षित पुनरागमनाबद्दल चिंतेत आहेत. त्यांनी सोशल मीडियावर युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर यांना आवाहन केले, “तुम्ही आम्हाला घरी पोहोचवू शकाल का?” इंग्लंड लायन्स संघ सध्या अबू धाबीमध्ये आहे, जिथे अलिकडच्या काळात मोठ्याने स्फोट ऐकू येत आहेत. स्थानिक मोबाईल फोन अलर्ट जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये लोकांना सुरक्षित इमारतींमध्ये आश्रय घेण्याचा आणि संभाव्य क्षेपणास्त्र धोक्यामुळे खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या घडामोडीमुळे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये म्हटले आहे की संघ आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. बोर्डाने स्पष्ट केले की ते सुरक्षा तज्ञ आणि सरकारशी सतत संपर्कात आहे आणि सर्व अधिकृत सल्ल्याचे पालन केले जात आहे. यामुळे पाकिस्तानविरुद्धचा नियोजित सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोर्डाने सूचित केले आहे की परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील वेळापत्रक ठरवले जाईल.

जॉनी बेअरस्टोची क्रिकेटमधील कारकीर्द- (Jonny Bairstow Cricket Carrier)

36 वर्षीय जॉनी बेअरस्टो आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडू आहे. त्याने 52 सामन्यांमध्ये 34.87 च्या सरासरीने 1674 धावा केल्या. हैदराबादने 2022 च्या मेगा लिलावापूर्वी रिलीज केले. त्यानंतर त्याला पंजाब किंग्जने खरेदी केले. पायाच्या दुखापतीमुळे जॉनी बेअरस्टो आयपीएल 2023 मध्ये खेळला नाही. सध्या जॉनी बेअरस्टो आयपीएलमधून मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतो. जॉनी बेअरस्टोने अद्याप अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही, परंतु 2024 पासून जॉनी बेअरस्टो इंग्लंड संघाबाहेर आहे आणि संघात परतण्याचा त्याचा मार्ग बराच कठीण दिसत आहे. इंग्लंडसाठी त्याने 100 कसोटी सामन्यात 6042 धावा, 107 एकदिवसीय सामन्यात 3868 धावा आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1671 धावा केल्या आहेत.

संबंधित बातमी:

Ind vs WI T20 World Cup 2026: तो पहिली ओव्हर टाकायला येणार…; वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी अश्विनचा टीम इंडियाला इशारा, सगळं सांगून टाकलं!

आणखी वाचा

Comments are closed.