रॉचे माजी प्रमुख डोभाल यांना समन्स बजावा!

अमेरिकेच्या न्यायालयाची दिल्लीतील तीन न्यायालयांकडे मदतीची मागणी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रॉचे माजी प्रमुख यांना समन्स बजावण्याच्या प्रक्रियेसाठी अमेरिकेतील एका न्यायालयाने दिल्लीतील तीन न्यायालयांची मदत मागितली आहे. संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत न्यायालयीन नोटीस पोहोचवण्यासाठी ही मदत मागण्यात आली आहे. या घडामोडीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील कायदेशीर व राजनैतिक वर्तुळात चर्चेला सुऊवात झाली आहे. अमेरिकेतील न्यायालयाने दिल्लीतील न्यायालयांना समन्स बजावण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करण्याची विनंती केली आहे. या माध्यमातून संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रियेची अधिकृत माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

समन्स बजावण्याच्या प्रक्रियेला महत्त्व

परदेशातील न्यायालयीन प्रकरणांमध्ये दुसऱ्या देशातील व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. त्यासाठी संबंधित देशातील सक्षम न्यायालये किंवा अधिकृत यंत्रणांची मदत घेतली जाते. अमेरिकन न्यायालयाने दिल्लीतील तीन न्यायालयांकडे केलेली मदतीची मागणी याच प्रक्रियेचा भाग असल्याचे मानले जात आहे.

प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे लक्ष

या समन्सचा संबंध नेमक्मया कोणत्या खटल्याशी आहे, त्यातील आरोपांचे स्वरूप काय आहे आणि दिल्लीतील न्यायालये या विनंतीवर कोणती भूमिका घेतात, याबाबत अधिकृत तपशील उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरणार आहे. समन्स बजावण्याची विनंती म्हणजे संबंधित व्यक्तींवरील आरोप सिद्ध झाले आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींनंतरच याचे स्वरूप स्पष्ट होईल.

Comments are closed.