शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; राज ठाकरेंनाही घातलं साकडं, काय म्हणाले?
दादर काबूटर खाना वर जैन मुनी: मुंबईच्या दादरमधील कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) सुरु ठेवण्यासाठी जैन समाज (Jain Community) चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कबुतरखाने बंद केले होते. यानंतर दादरच्या कबुतरखान्याजवळ जैन समजाकडून आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनादरम्यान कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री देखील फाडून टाकण्यात आली. यावेळी जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain Muni) यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती.
आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचं काम नाही. जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू, असं विधान जैन मुनी निलशचंद्र विजय यांनी केलं होतं. जैन मुनी निलशचंद्र विजय यांच्या या विधानावरुन न्यायालयाच्या आदेशाचा धाक आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. याचदरम्यान आता जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा यू-टर्न-
मी शांतीने आंदोलन करणार आहे. तसेच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने आमचं ऐकलं नाही, तर आम्ही शस्त्र उचलू, पण शस्त्र उचलू म्हणजे आम्ही शांतीपूर्ण उपोषण करु, असं निलेशचंद्र विजय म्हणाले. महात्मा गांधी यांनी देखील शांततेने आंदोलन केले, तसे आम्ही देखील शांतीपूर्ण आंदोलन करु, असं निलेशचंद्र विजय यांनी सांगितले. देशभरातली जैन बांधव आंदोलनासाठी इथे येतील. जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? मी एकटा आंदोलनाला बसणार नाही. देशभरातली 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला.
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचं राज ठाकरेंना साकडं- (Jain Muni On Raj Thackeray)
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील साकडं घातलं आहे. तुम्हाला मराठी हिंदुहृदयसम्राट म्हणतात. तुम्ही मराठी-मारवाडी वाद मिटवा. तसेच आम्ही मारवाडी लोक देखील तुमच्यासोबत आहेत. जो कोणी मराठी भाषेचा अपमान करतील, जो मराठी भाषेला सन्मान देत नाही, त्यांच्या विरोधात तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं जैन मुनी निलेशचंद्र यांनी सांगितले. तसेच मराठी लोकांची मी माफी मागतो, मराठी एकीकरण समितीचा गैरसमज झालाय, असंही जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले.
जैन मुनी निलेशचंद्र विजय नेमकं काय म्हणाले होते?
आम्ही सत्याग्रह आणि उपोषणाचा मार्ग वापरणार आहोत. जैन समाज शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचं काम नाही. जे लोक शस्त्र उचलतात, ते आमचे नाहीत. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रं पण उचलू. आम्ही भारताचं संविधान मानतो ना, कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना. पण आमच्या धर्माच्याविरोधात आलं तर आम्ही कोर्टालाही मानत नाही, असे निलेशचंद्र विजय यांनी म्हटले. हे प्रकरण न्यायालयात सुरु आहे. कबुतरं मरता कामा नयेत. सरकारच्या आदेशानंतर पक्षांना खाद्य टाकणं सुरू झाले आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन हा सगळा प्रकार सुरु आहे. आमचं पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आता आम्ही शांत बसणार नाही, असं विधान जैन मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले होते.
मराठी एकीकरण समितीचं आंदोलन-
दादरचा कबूतर खाना कायमचा बंद झाला पाहिजे. तसेच कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र या आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. या पोलिसांच्या या नोटिसेनंतरही कबुतरखान्याजवळ सकाळी 11 नंतर आंदोलक जमण्यास सुरुवात झाले. यानंतर तात्काळ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
https://www.youtube.com/watch?v=eudda6jjqgo
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.