डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू,मोबाईलवर बोलत होता चालक; जमावाकडून तोडफोड
जळगाव : रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. वाहतूक व्यवस्था, नियमावलींच्या प्रचार-प्रसारातून रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही अपघाताच्या (Accident) घटना घडतच आहेत. जळगाव (Jalgaon) शहरातील कालिंका माता चौकात डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची भीषण घटना घडली. प्रभाकर पाटील असे 57 वर्षीय वृद्धाचे नाव असून परिसरात घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाकडून डंपरवर दगडफेक व तोडफोड करण्यात आली.
जळगाव शहरातील कालिंका माता चौक येथे भरधाव डंपरने भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. प्रभाकर पाटील (वय ५७) हे भाजीपाला घेऊन घरी जात असताना अपघात झाला असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान डंपर चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे अपघात झाला असून चाक थेट तोंडावरून गेल्यामुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. याच चौकात साधारण वर्षभरापूर्वी डंपरने एका बालकाला चिरडल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथे अद्ययावत सिग्नल व्यवस्था सुरू करावी तसेच 24 तास वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही सुनेत्रा पवारांचेच नाव
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार याची चर्चा होत असताना आता सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल यांचे नाव समोर आले होते. त्यावरुन, राजकीय वर्तुळात वेगळ्याच आणि विरोधात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. तर, राष्ट्रवादीचे आमदार, खासदारही आपलं मत मांडताना सुनेत्रा पवार यांच्या नावाची मागणी करत होते. तर, पार्थ पवार यांचेही नाव पुढे आले होते. मात्र, पुढील दोन आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असून सुनेत्रा पवार यांचीच निवड केली जाणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.