‘आई, मी गेल्यावर रडू नकोस’; गर्लफ्रेंडने लग्नाला नकार देताच बॉयफ्रेंडनं उचललं टोकाचं पाऊल, जळग
जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या प्रेयसीनं लग्नासाठी नकार दिल्यामुळं तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील गौरव बोरसे या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरूणाने त्याच्या सोशल मिडीया इंस्टाग्रामवरती (Instagram) त्याने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘मी एका तरुणीसोबत चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही लग्नही केले होते. पण त्यावेळी आमचे दोघांचे वय कमी होते. आता मात्र त्या तरुणीने लग्नासाठी नकार दिला आहे, तू मला विसरून जा’, असं ती मला सांगत आहे. ही घटना 7 ऑगस्ट रोजी घडली आहे.
पुढे तो व्हिडीओमध्ये म्हणतो की, ‘चार वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ती मला विसरून जा. असं कसं सांगू शकते तू’? असा सवाल देखील या तरुणाने व्हिडिओ पोस्ट करत विचारला आहे. ‘आई तू माझ्या मृत्यूनंतर जास्त रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. वडील खूप गरीब आहेत, त्यांना त्रास देऊ नकोस, त्यांना पण सांग, जास्त रडू नका’, असं देखील गौरव बोरसे याने या व्हिडिओमधून म्हटलं आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. गौरवने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
‘प्रेमात मी खूप दुःखी आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे. तुम्ही हा निर्णय घेऊ नका माझे वडील खूप गरीब माणूस आहे. प्रेमामध्ये चुकीचा निर्णय मित्रांनो घेऊ नका. जो आज मी प्रेमामध्ये चुकीचा निर्णय घेत आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मित्रांनो मला माफ करा. मला प्रेमात खूप त्रास होत आहे, म्हणून मी हा निर्णय घेत आहे’, असं त्याने या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील गौरव बोरसे या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. #जॅलगोन्यूज #क्रिमहेन्यूज #Video pic.twitter.com/thls7fhwty
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 12 ऑगस्ट, 2025
प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्याने गळ्याला दोर लावली
गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नामक विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या विद्यार्थ्याने हाताने लिहिलेली चिठ्ठी मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवली व त्यानंतर गळफास घेतला. मात्र ती चिठ्ठी वर्ग मित्रांनी बघताच तो राहत असलेल्या रूमवर त्यांनी धाव घेतली, आणि त्याचे प्राण वाचविले. त्या चिठ्ठीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने त्या विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द बोलून विद्यार्थ्याचा छळ केल्याचे त्याने लिहिलेल्या त्या पत्रावरुन दिसून येत आहे. विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे.
प्राध्यापकाच्या मानसिक त्रासाला कंटाळून गळफास घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील भाड्याच्या खोलीत रविवारी मध्यरात्रीनंतर 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आवेश कुमार (22, रा. भरतनगर, राजस्थान), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सिव्हिल लाइन्स परिसरातील शीतला माता मंदिर चौकात आवेश भाड्याच्या खोलीत राहत होता. याच खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर हाताने लिहिलेली चिठ्ठी पोस्ट करत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
आणखी वाचा
Comments are closed.