एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचं भासवत तब्बल 20 जणांना लाखोंना गंडवलं, जळगावातील दाम्पत्याचा कारनामा
जलगाव गुन्हा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या नावाचा गैरवापर करून तब्बल 55 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी या दाम्पत्याने हा सगळा प्रकार केला असून त्यांनी एकनाथ शिंदे यांचे ‘स्वीय सहाय्यक’ असल्याचा बनाव करत 18 ते 20 नागरिकांना रोजगार आणि घरे देण्याचे आमिष दाखवून मोठी आर्थिक फसवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.
बनावट दस्तऐवजांचा वापर
फसवणुकीसाठी दाम्पत्याने एकनाथ शिंदे यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र, लेटरपॅड आणि अपॉइंटमेंट लेटर तयार करून पीडितांना दाखवले. यात त्यांनी शासकीय नोकरी, विशेषतः रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
नोव्हेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान फसवणूक
या दाम्पत्याने नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार राबवला. यात हर्षल शालिग्राम बारी या व्यक्तीकडून एकट्याकडून 13 लाख 38 हजार रुपये, तर उर्वरित लोकांकडून मिळून 42 लाख 22 हजार रुपये उकळले. हा संपूर्ण आर्थिक व्यवहार जळगावमधील कालिका माता मंदिर परिसरातील दूध डेअरीमध्ये पार पडल्याचे उघड झाले आहे.
फसवणूक लक्षात येताच पोलीसांत धाव
यानंतर बराच काळ वाट पाहूनही ना नोकरी मिळाली, ना कोणतेही आश्वासन पूर्ण झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तत्काळ हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Nashik Crime : नाशिकमध्ये देखील फसवणुकीचा प्रकार
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसखासदार श्रीकांत शिंदे तसेच मंत्री गुलाबराव पाटील हे माझ्या खूप जवळचे असून पोलीस दलात नोकरी लावून देण्याची आमिष युवतीच्या आईला वारंवार दाखवल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील औरंगपूर येथील स्वाती राजेंद्र चाबुकस्वार 19 वर्षीय युवतीची साडे चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अभिषेक प्रभाकर पाटील (रा. एकुलती, ता. जामनेर, जिल्हा जळगावहल्ली मुक्काम द्वारका, नाशिक) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला निफाड न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.