आई रागवल्याने अल्पवयीन मुलाने अन् दुसऱ्या घटनेत सावकाराच्या जाचाला कंटाळून युवकाचं टोकाचं पाऊल;

जळगाव क्राईम न्यूज : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका ठिकाणी आईच्या रागाचा मनावर परिणाम झाल्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेतला, तर दुसरीकडे सावकाराच्या जाचाला कंटाळून 25 वर्षीय युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.

Jalgaon Crime News: अभ्यासावरून रागावल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगावमधील जोशी कॉलनी परिसरात पहिली घटना घडली. ला. ना. शाळेत आठवीत शिकणाऱ्या प्रथम हरीश कटारे (वय 15) या विद्यार्थ्याने घरी कोणी नसताना घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. अभ्यास करत नसल्यामुळे आईने रागावल्याचे त्याला मनावर लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाणे जळगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Jalgaon Crime News: सावकाराच्या तगाद्याला कंटाळून युवकाचा टोकाचा निर्णय

दरम्यान, चोपडा शहरातील लोहिया नगर परिसरात योगेश सुनील चौधरी (वय 25) या युवकाने गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेशच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत ‘पिंटू’ नावाच्या व्यक्तीकडून घेतलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे हा निर्णय घेतल्याचा उल्लेख आहे.

योगेशने संबंधित व्यक्तीकडून 10 हजार रुपये घेतले होते. मात्र, त्याने दोन लाखांहून अधिक व्याज परतफेड केल्याचा दावा चिठ्ठीत करण्यात आला आहे. तरीही पैशांसाठी वारंवार तगादा, धमक्या आणि मारहाणीमुळे त्रस्त झाल्याचे त्याने नमूद केले आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्याने चिठ्ठीत केली आहे. योगेश हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार असून कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: रागाच्या भरात बाप हैवान झाला, पोटच्या 9 वर्षांच्या पोराला गरम इस्त्रीचे चटके, अमानुष मारहाण अन्.. भाईंदरपूर्वमध्ये भयंकर घटना

Nagpur Accident News :  एका अपघातातून बचावले, पण काही तासात पुन्हा काळानं झडप घातली; नागपुरात एकाच जागीच, तर एकाचा उपचारदरम्यान दुर्दैवी अंत!

आणखी वाचा

Comments are closed.