सामाजिक कार्यकर्ता ते ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र; जळगावमध्ये महिलेकडे e-KYCच्या बहाण्याने शरीरसु

जळगाव : जळगावात केवायसीच्या बहाण्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी (Jalgaon Crime News) करण्यासह अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय गोकुळ रमेश चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचे असल्याने चव्हाण महिलेच्या घरी आला व कागदपत्रे घेत शरीरसुखाची (Jalgaon Crime News) मागणी केली. अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो, असे म्हणत चव्हाण याने प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर गोकुळ चव्हाण फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे.(Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News : जळगाव शहरात आरोपीचे ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र

गोकुळ चव्हाण हा सामाजिक कार्यकर्ता असून त्याचे जळगाव शहरात ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र असल्याची पोलिसांची माहिती आहे. याप्रकरणात रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेबाबत जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी माहिती देताना सांगितलं की, दोन महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेंदालाल मिल परिसरातील दोन पीडित महिलांनी गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.(Jalgaon Crime News)

Jalgaon Crime News : कागदपत्रे आणि ई-केवायसी अपडेट करण्यासाठी घरी बोलावले

पहिल्या पीडितेच्या तक्रारीमध्ये, ‘पीडित महिलेच्या पतीने आरोपी गोकुळ चव्हाण याला घरचे कागदपत्रे आणि ई-केवायसी (e-KYC) अपडेट करण्यासाठी घरी बोलावले होते. आरोपी हा पीडितेच्या पतीचा मित्र असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. या संधीचा फायदा घेत त्याने पीडित महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि तिला अश्लील मागणी केली. पीडितेने या प्रकाराबाबत पतीला सांगणार असल्याचे म्हटल्यावरही त्याने तिचा पाठलाग करणे आणि त्रास देणे सुरूच ठेवले होते.

Jalgaon Crime News : प्रेमसंबंधाची मागणी करत वारंवार त्रास

दुसऱ्या पीडितेच्या तक्रारीमध्ये, आरोपीविरुद्ध पहिली तक्रार दाखल होत असल्याचे समजताच दुसऱ्या एका पीडित महिलेनेही पोलिसांकडे धाव घेतली. या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने एका शासकीय योजनेच्या कामासाठी तिचा मोबाईल क्रमांक मागितला होता. त्यानंतर त्याने तिच्याकडे प्रेमसंबंधाची मागणी करत वारंवार त्रास दिला.

तर आरोपीचे पूर्ण नाव गोकुळ रमेश चव्हाण असून तो गेंदालाल मिल परिसरातीलच रहिवासी आहे. तो स्वतःला ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणून घेतो आणि ‘सीएससी’ (CSC) केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्याचे काम करतो. पोलिसांनी दोन्ही महिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विनयभंग आणि पाठलाग करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे आणखी काही महिलांची अडवणूक केली आहे का, याचीही चाचपणी केली जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Rohini Khadse: याप्रकरणी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे संतापल्या

लाडकी बहिण योजनेच्या E-KYC साठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का ? असा सवाल त्यांनी थेट मंत्र्यांना केला आहे. रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की, आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे दोन धक्कादायक प्रकरण घडले आहेत. मंत्री महोदय आदिती तटकरे, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का ?

एकनाथ शिंदे भाई, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट महिलांना या योजनेचे पैसे देण्यात आले. आता मतदान मिळाल्यानंतर मात्र योजनेसाठी विविध अटी, शर्ती लावल्या जात आहे. ही E-KYC करत असताना महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कुठे बँक खात्याची अडचण येत आहे, कुठे मोबाईल नंबरची, काही महिलांचे तर सर्व कागदपत्रांची जुळणी झाली असताना त्यांना या योजनेतून बाद केले जात आहे. यामुळे महिलांची प्रचंड धावपळ होत आहे. यात काही राक्षसी वृत्तीचे लोक डाव साधतात. यात तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.