मी एसपी, आयजी, डीजीला घाबरत नाही, पालकमंत्री माझ्या खिशात, पीआयकडून महिलेसोबत नको ते कृत्य

जलगाव गुन्हा: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संदीप पाटील (Sandeep Patil) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ही कारवाई करत त्यांच्यावर खातेअंतर्गत प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. (Jalgaon Crime News)

काय आहे प्रकरण?

29 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे, आमदार चव्हाण यांनी यावेळी एक ऑडिओ क्लिप सादर करत त्यातील संवाद ऐकवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये आणि प्रशासनात खळबळ माजली.

संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

या आरोपांनंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र महिलेने ऐनवेळी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला नाही. तरीही, या गंभीर आरोपांची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दखल घेत, सविस्तर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला. त्यानंतर संदीप पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

पालकमंत्री माझ्या खिशात

संदीप पाटील यांनी 2023 साली एका गुन्ह्यात महिलेला मदत केली होती, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आमदार चव्हाण यांच्या मते, संदीप पाटील यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तक्रार देण्याचा इशारा दिल्यानंतर, पाटील यांनी “एसपी, आयजी, डीजी मला काही करू शकत नाहीत. पालकमंत्री माझ्या खिशात आहेत,” अशी थेट धमकी दिली. इतकंच नव्हे तर “आमदारालाही गोळ्या घालून ठार मारेन” असा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

निलंबनासह खातेअंतर्गत चौकशीचे आदेश

या प्रकारानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. “जर एखादा पोलीस अधिकारी लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीने धमक्या देतो, तर सामान्य नागरिकांचं काय?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आता संदीप पाटील यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्फत खातेअंतर्गत प्राथमिक चौकशी होणार आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निष्कर्षानुसार पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती मिळत आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Vanraj Andekar Case: ‘टपका रे टपका, एक ओर टपका’, संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? टोळीयुध्द पुन्हा भडकण्याची शक्यता

आणखी वाचा

Comments are closed.