शेतात काम करताना तोल गेला अन् रोटरमध्ये सापडून 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; जळगावात काळीज पि

जळगाव वार्ता: शेतजमीन तयार करत असताना ट्रॅक्टरवरून अचानक तोल जाऊन पडल्याने, रोटरमध्ये सापडून ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल (Yawal) तालुक्यात समोर आली आहे. योगेश यशवंत पाटील (वय 28, रा. दहिगाव, ता. यावल) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे यावल परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून दहिगाव आणि मोहराळा गावांवर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मोहराळा गावाच्या शेतशिवारात शोभराज महाजन यांचे शेत आहे. या शेतात जमीन मशागतीचे काम करण्यासाठी दहिगाव येथील रहिवासी असलेला योगेश पाटील हा तरुण स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर (Tractor) घेऊन गेला होता. शेतात रोटर फिरवून जमीन सपाटीकरण करत असताना, अचानक ट्रॅक्टरवर बसलेल्या योगेशचा स्वतःचा तोल गेला.

Jalgaon News: योगेशचा जागीच मृत्यू

तोल गेल्याने तो थेट चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळला आणि मागे फिरत असलेल्या रोटरच्या तीक्ष्ण पात्यांमध्ये अडकला. रोटरचा वेग जास्त असल्याने गंभीर दुखापत होऊन योगेशचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण प्रकार शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ धाव घेत या घटनेची माहिती मृत योगेशच्या कुटुंबाला दिली.

Jalgaon News: रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी शेतात धाव घेतली. योगेशला रोटरमधून बाहेर काढून अत्यंत गंभीर अवस्थेत तात्काळ यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांनी तपासणी करून योगेशला मृत घोषित केले. 28 वर्षीय तरुणाच्या अशा अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Jalgaon News: यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

या भीषण अपघाताप्रकरणी राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात (Yawal Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडे आणि राजेंद्र पवार पुढील तपास करीत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: कांद्याला कवडीमोल भाव अन् कर्जाचा डोंगर, कांदा उत्पादक शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा; नाशिकमधील हृदयद्रावक घटना

NEET Exam Paper Leak: मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाइलमधील तो ‘गॉड’ कोण? समोर आली चक्रावणारी माहिती

आणखी वाचा

Comments are closed.