उधारीचे पैसे परत मिळाले नाही; रविंद्रने रेल्वेखाली आयुष्यच संपवलं, डॉक्टरांवर केले गंभीर आरोप
जळगाव क्राईम न्यूज : पैसे परत दिले नाही म्हणून पैसे देणाऱ्या व्यक्तीने (Jalgaon) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही भयंकर घटना जळगावच्या पाचोरा (Jalgaon Crime news) तालुक्यातील संभाजीनगर येथे घडली असल्याची माहिती आहे. पाचोरा तालुक्यातील संभाजीनगर येथील रहिवासी रवींद्र महाजन यांनी आपलं आयुष्य संपवलं असून, त्यांनी नगरदेवळा रेल्वे पुलापासून सुमारे 200 मीटर अंतरावर रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ केला तयार; रविंद्र महाजन व्हिडीओत नेमकं काय म्हणाले? (Jalgaon Crime Ravindra Mahajan Ends Life)
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते पाचोरा तालुक्यातील संभाजीनगर येथील रहिवासी होते. त्यांनी डॉ. समाधान पाटील (रा. संभाजीनगर) यांना बिनव्याजी पैसे उधारी दिले होते. डॉ. समाधान पाटील (रा. संभाजीनगर) आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद झाला होता.
शुक्रवारी सायंकाळी संबंधित हॉस्पिटलमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी रवींद्र महाजन आणि डॉक्टर दोघांमध्ये झटापट झाली. वेळोवेळी पैसे परत मागूनही पैसे परत मिळत नसल्याने रविंद्र यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ शूट केला.
यानंतर रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाची प्राथमिक नोंद भडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून संबंधित परिसर हा रेल्वे पोलिस (GRP) चाळीसगाव यांच्या हद्दीत येत असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्यांनी डॉ. समाधान पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘माझ्या आत्महत्येस डॉ. समाधान पाटील जबाबदार आहेत. मी त्यांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला पैसे दिले नाही. माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यात यावी. मला सरकारने न्याय द्यावा’, असं त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाजन कुटुंब आणि समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Comments are closed.