मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
जालना : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली. दीपक बोऱ्हाडे यांच्या घरीच (Jalna) आज दुपारी त्यांनी गळफास लाऊन जीवन संपवलं. ते 78 वर्षाचे होते, त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंब आणि नातेवाईकांना धक्का बसला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दीपक बोऱ्हाडे हे गेल्या 10 दिवसांपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसले आहेत.
राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा लढ तीव्रपणे सुरू असताना दुसरीकडे ओबीसी बचाव आंदोलनासाठी धनगर समाजाच्या लक्ष्मण हाके आणि दीपक बोऱ्हाडे यांनीही उपोषण केले होते. जालन्यातील आंतरवालीत त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण कमी होऊ ने देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी उपोषण केले होते. त्यानंतर, आता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातू आरक्षण देण्याची मागणी करत दीपक बोऱ्हाडे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सुरू असतानाचा त्यांच्या सासऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे, आता दीपक बोऱ्हाडे आपलं उपोषण संपवून जालन्याकडे येतील अशी माहिती आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.