वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतरचे सेलिब्रेशन जेमिसनला पडले महागात, बीसीसीआयकडून कडक कारवाई

आयपीएल २०२६ हंगामातील ४३ वा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये दिल्लीचा संघ ७ गडी राखून विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज काइल जॅमिसोनला आयपीएलकडून ताकीद आणि कडक शब्दांत फटकारण्यात आले. जेमिसनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेंडूने शानदार सुरुवात केली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर १५ वर्षीय आक्रमक सलामीवीर वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली. मात्र, ही विकेट घेतल्यावर त्याने ज्या आक्रमक पद्धतीने जल्लोष केला, ते पाहून सर्वजण थक्क झाले होते.

​वैभव सूर्यवंशीने काइल जेमिसनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लॉन्ग ऑफला चौकार लगावला होता. त्यानंतर वैभवने दुसऱ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण जेमिसनचा आत येणारा चेंडू समजण्यात तो चुकला आणि बोल्ड झाला. यानंतर जेमिसनने अत्यंत आक्रमकपणे सेलिब्रेशन केले आणि वैभवच्या जवळ जाऊन जोराने गर्जना केली. याच कारणास्तव, सामन्यानंतर काइल जेमिसनला आयपीएल आचारसंहितेच्या ‘लेव्हल १’ चा भंग केल्याबद्दल दोषी आढळले. त्याला केवळ कडक फटकारलेच नाही, तर त्याच्या खात्यात एक 'डिमेरिट पॉइंट' देखील जोडण्यात आला आहे.

​काइल जेमिसनने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची आपली चूक मान्य केली आहे. आयपीएलने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेमिसनला आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी धरण्यात आले आहे. हे कलम खेळाडूच्या अशा वागणुकीशी संबंधित आहे ज्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडू भडकू शकतो. जेमिसनने या प्रकरणी मॅच रेफरी राजीव सेठ यांनी दिलेली शिक्षा स्वीकारली आहे, त्यामुळे आता या प्रकरणाची पुढे कोणतीही सुनावणी होणार नाही. या सामन्यात जेमिसनने सुरुवात तर चांगली केली होती, पण ती त्याला कायम राखता आली नाही. त्याने आपल्या ४ षटकांत ४८ धावा देऊन केवळ एकच बळी घेतला.

Comments are closed.