कला केंद्रातील दिपाली विवाहित, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शन; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती


अहिल्यानगर : जिल्ह्यातील जामखेड (अहिल्या नगर) येथील तपनेश्वर भागात राहणाऱ्या आणि कला केंद्रात नर्तक म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने दोन दिवसांपूर्वी जामखेडच्या खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, भाजपशी निगडीत असलेल्या संदीप गायकवाड याने दिपाली पाटील हिला सातत्याने लग्नाचा तगादा लावल्यानेच दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप तिची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे. त्यावरुनआता राजकारण वातावरणही तापले असून संबंधित कला केंद्राचे मालक अरविंद जाधव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. दिपाली अत्यंत गरीब होती, तिने तीन महिन्यांपूर्वीच कला केंद्र सोडले होते, असे जाधव यांनी सांगितले.

दिपाली पाटील ही नर्तक जैवनाशक गेली असताना, राजकारण्यांना मात्र आयते कोलीत मिळाल्याने ते या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवताना दिसत आहेत. कारण, याप्रकरणातील आरोपी संदीप गायकवाडची पत्नी लता गायकवाड यांनी बिंदूf आणि झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 5 ब मधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. संदीप गायकवाड हा स्वतः विवाहित असताना तो दिपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारात रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना नगरपरिषद निवडणुकीत भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली असल्याचे वारंवार म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्याच उमेदवाराच्या पतीने दबाव टाकलन्याने एका नर्तिकेना आत्महत्या केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. रोहित पवारांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करनाही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणावर राज्यातील इतरही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून हे घटना दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं राजकीय नेत्यांनी म्हटल आहे.

दिपाली विवाहित, दोन मुलांची आई

दिपाली पाटील ही मुळची कल्याण येथील रहिवाशी होती, तिचा विवाह झाला असून तिला दोन मुलं होती. मात्र, नवऱ्यासोबत मतभेद झाल्याने ती स्वतंत्र राहत होती, तिचे दोनहि मुलं हे कल्याण येथे आजीसोबत आराम आहेत. तर घरातील आर्थिक परिस्थिती बेताच्या असल्याने तिने कला केंद्रात काम करणं पत्करलं. काही दिवसांपासून ती संदीप गायकवाडच्या संपर्कात होती आणि संदीप गायकवाड हा तिला लग्नासाठी दबाव टाकत होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ती बाजारात जाऊन येते असे सांगून बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रेक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता आणिआय आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. दिपाली ज्यावेळेला लॉजवर गेल होतत्या वेळेला संदीप देखील त्या ठिकाणी आला होता हे सीसीटीव्हीतून समोर आल आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली आहे

संदीप गायकवाड आधी राष्ट्रवादीत

संदीप गायकवाड हा जरी सध्या भाजपमध्ये असला तरी तो यापूर्वी राष्ट्रवादी पक्षात होता. तो आणि त्याची पत्नी लता गायकवाड हे दोघेही माजी नगरसेवक आहेत. संदीप गायकवाड याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून तो याच निवडणुकीत भाजपमध्ये गेला. मात्र, दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणात त्याचे नाव आले आणि त्याच्यासह भाजप पक्षालाही टिकेच धनी व्हावे लागलं .

दिपालीने तीन महिन्यांपूर्वीच कला केंद्र सोडले

दरम्यान, दिपाली पाटील ही अतिशय गरीब कुटुंबातील असून उदरनिर्वाह भागवण्यासाठी जामखेड येथील कला केंद्रवर काम करत होतइ. मात्र, मागील तीन महिन्यांपासून तिने घुंगरू हे कला केंद्र सोडून दिल्याचं घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी सांगितलं. दिपाली पाटील या मूळच्या कल्याणमधील आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन-तीन महिन्यांपूर्वी आमच्या कला केंद्रात आल्या होत्या. सध्या त्या आमच्याकडे नव्हत्या. दिपाली पाटील परिस्थितीने खूप गरीब होत्या, असेही जाधव यांनी सांगितले.

आणखी वाचा

Comments are closed.