दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल

अभिजीत दिपके वर पीएम मोदी: कॉकरोच जनता पार्टीने मोदी सरकारला गर्भित इशारा दिला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून मोदी सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने आता कॉकरोच जनता पार्टीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरती घणाघाती प्रहार केला आहे. आज (25 जुलै) जंतर मंतर वरून बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी गर्भित इशारा दिला. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाची हाक देऊ असा इशाराच दिला आहे. इतकेच नव्हे तर आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचासुद्धा राजीनामा हवा असल्याचेही म्हटले आहे.

तुमचा खाकी गणवेश काढा आणि तुमची RSS हाफ पँट घाला

दरम्यान, अभिजित दीपके यांनी मोदींवर कडाडून प्रहार केला. अभिजित दीपके म्हणाले की, मोदींनी आता चहाची टपरी पुन्हा एकदा उघडावी आणि त्याठिकाणी राघव चड्डांना उभे करावे समोसे विकण्यासाठी. राघव चड्डांवरूनही अभिजित दीपके यांनी चांगलीच तोफ डागली. ते म्हणाले की, ते जेन जी लीडर बनायला चांगले होते अशा शब्दांमध्ये राघव चड्डा यांच्यावर तोफ डागली. दरम्यान, अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांकडून सुरू असलेल्या दमनशाही विरोधात सुद्धा हल्लाबोल केला. दिल्ली पोलिसांनी आता खाकी वर्दी उतरवून RSS ची हाफ चड्डी घालावी अशा शब्दात टोला लगावला आहे.

दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनीसुद्धा दिल्ली पोलिसांच्या कारभारावरून हल्लाबोल केला. दानागोटा बंद करून उपासमार करायची आहे का? अशी विचारणा सुद्धा सौरभ दास यांनी केली. ज्या पद्धतीने गाझा पट्टीमध्ये नाकाबंदी करण्यात येत आहे त्याचपद्धतीने जंतर मंतरवरतीसुद्धा करण्यात येत आहे का? अशी विचारणा केली. जर दिल्ली पोलिसांकडून असे सुरू राहिले तर आम्ही दिल्ली पोलिस आयुक्तालयावर धरणे आंदोलन करू असा इशारा सुद्धा सौरभ दास यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Comments are closed.