शिवाजी पार्कमधील CJP च्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना जावेद अख्तर यांनी फटकारले
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने मुंबईत आंदोलन पुकारले आहे. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे हे आज आंदोलन होणार असून शिवसेनेनेही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवाशांनीही याला विरोध केला आहे. यावरून राजकारण तापलेले असतानाच ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथा लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यांनी सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना फटकारले आहे.
जावेद अख्तर यांनी शुक्रवारी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. शिवाजी पार्क परिसरातील काही रहिवासी ध्वनिप्रदूषणाबाबत संवेदनशील होत असून सीजेपीचे आंदोलन रद्द करण्याची मागणी करत आहेत, याचा आपल्याला आनंद आहे. मात्र, शिवाजी पार्क परिसरात होणाऱ्या अन्य कार्यक्रमावरही हेच रहिवासी अशाच प्रकारे आक्षेप नोंदवतील, अशी आशा व्यक्त करत जावेद अख्तर यांनी सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना सुनावले आहे.
मला खूप आनंद होत आहे की शिवाजी पार्कमधील काही निवासस्थाने ध्वनी प्रदूषणाबाबत संवेदनशील होत आहेत आणि आज शिवाजी पार्कमध्ये CJP चा निषेध रद्द करण्याची विनंती अधिकाऱ्यांना करत आहे. मला शंभर टक्के खात्री आहे की ते त्याच तीव्रतेने तेच आक्षेप घेतील नाही तर…
— जावेद अख्तर (@Javedakhtarjadu) 2 ऑक्टोबर 2026
Comments are closed.