तुम्हाला राज्याचं अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा; जयंत पाटील पहिले हसले आणि म्हणाले…

देवेंद्र फडणवीस भेटीवर जयंत पाटील: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील (Jayant Patil), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी काल (14 जुलै) रात्री अचानक ‘वर्षा’वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आलं. (Jayant Patil Meet Devendra Fadnavis)

जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची वेगळी बैठक झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील देखील वर्षावर पोहोचले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आला नाही. या भेटीवर आज जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली, भेटीत काय घडलं?, जयंत पाटील यांनी सगळं सांगितलं- (Jayant Patil On Devendra Fadnavis Meet)

माझ्या मतदारसंघातील एका कामासाठी मी त्यांची भेट घेतली. 2002-03 सालापासून त्यांच्याकडे अतिक्रमणाची कुठलीही नोटीस नाही. तरीही त्यांच्याविरोधात तक्रार केली गेली. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. तशी त्यांनी वेळ दिली मात्र भेटीला उशीरच झाला. मी विषय सांगितल्यानंतर मला मुख्यमंत्री म्हणाले की, मी त्याकडे लक्ष घालतो. आम्ही 5-10 मिनिटं भेटलो. मी हॉलमध्ये बसलो होतो. तेव्हा मुख्यमंत्री तिथे बऱ्याच वेळाने आले. बाहेर आल्यानंतर मी आज खूप बैठकीत व्यस्त आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माझं बोलणं ऐकून घेतलं आणि मी याकडे लक्ष घालतो, असं सांगितल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत माझी कधीच भेट झाली नाही- जयंत पाटील (Jayant Patil On Sharad Pawar)

प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासोबत माझी कधीच भेट झाली नाही. माझी सुनील तटकरे आणि प्रफुल पटले यांची भेट झाली असती, तर मी नक्कीच सांगितलं असतं, असं जयंत पाटील म्हणाले. कुठली चर्चा झाली नाही. विलीनीकरण वगैरे याची चर्चा होण्याचा संबंधच नाही. त्यांच्यासोबत कोणताही विलीनीकरण याची चर्चाच झाली नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कुठली चर्चा नाही, ही चर्चा थांबली, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील अर्थमंत्रिपदाच्या चर्चांवर काय म्हणाले? (Jayant Patil On Maharashtra Finance Minister post)

सध्या अर्थमंत्रीपदी जयंत पाटील यांची वर्णी लागेल, अशी चर्चा आहे, यावर तुमचं मत काय?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर हसत हसत जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. मी कशाचाच विचार केला नाही. मग तुम्ही पुढचा विचार का करताय?, असा प्रतिसवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. खातेवाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार असतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार देखील घेत आहात. तुम्ही खूपच पुढचं विचारातंय. हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहेत. अर्थमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवत असतात, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे एकसंध आहोत. वारंवार अशाप्रकारच्या चर्चा समोर का येतात, यामुळे मला दुःख होतं, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.

विनोद तावडेंसोबतच्या भेटीवर जयंत पाटील काय म्हणाले? (Jayant Patil On Vinod Tawde)

संसदीय समितीची बैठक होती, त्या दरम्यान सुप्रिया सुळे तिथे होत्या त्यासोबत विनोद तावडे तिथे होते. विनोद तावडे यांच्या सोबत भेट झाली झाली. एका कार्यक्रमात गेल्यावर ते तिथे होते. त्यावेळी विनोद तावडेंसोबत कॉफी घेतली, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातमी:

Jayant Patil Meet Devendra Fadnavis: जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले; वर्षावर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित, रात्री काय घडलं?

Comments are closed.