देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य
मुंबई : राज्यात खांदेपालट होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सातत्याने होत असतात. मात्र, आता चक्क महायुतीमधील सत्ताधारी मंत्र्यानेच देवभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी आपण पांडुरंगाला साकडं घालू, असे म्हटलं आहे. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या किसान मोर्चाच्यावतीने सत्कार आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात बोलताना राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरले यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे भरणे यांनी म्हटले.
चांगली माणसं महाराष्ट्रातच राहिली पाहिजे, आपल्या भविष्यासाठी ते महाराष्ट्रातच राहिले पाहिजेत. पण, फक्त आपलाच विचार करुन चालत नाही कुटे साहेब. त्यामुळे, आज मी म्हणत नाही, पण योग्य वेळी महाराष्ट्र दिल्लीचा तक्तापासून लांब आहे, पण योग्यवेळी म्हणतोय मी. आता, 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, आपण पांडुरंगाकडे एकच विनंती करु, विठ्ठलाला साकडं घालू की, योग्यवेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. भरणे यांच्या या वक्त्वव्याने उपस्थिती शेतकऱ्यांना टाळ्या वाजवून दाद दिली.
किसान मोर्चाचे आपण कार्यकर्ते आहात, महायुतीत आपण एकत्र आहोत. सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी हा सत्कार आपण घेतला आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी आली, पिकं वाहून गेलं, अशात आपल्याला कोणी मदत केली असेल तर ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आज अजित दादा नाहीत मात्र त्यांनी तेव्हा फिल्डवर जात नुकसानीची पाहाणी केली होती. बोलणं सोपं पण करणं अवघड असतं. आपण संसार चालवतो तेव्हा सगळा विचार करावा लागतो, निवडणुका नाहीत मात्र मदत केली पाहिजे, तो शेतकरी उभा राहिला पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीससुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मदत केल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.
शेतकरी हिताचे निर्णय घेतले
महायुतीच्या कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे, कर्जमाफीचा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, रक्कम 40 हजार 585 कोटी रुपये झाली आहे. आपल्यासाठी काम करतात त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी मोठी मदत केली, प्रत्येक वर्षी वीजेसाठी 7.5 हॉर्सपंपासाठी दरवर्षी आपण 25 हजार कोटींची मदत करतोय, मदत करणं सोपं नाही आहे हे बाबांनो, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले. तसेच, 90 टक्के मार्क मिळाले तरी 10 टक्के कमी का मिळाले यासाठी प्रचार केला जातोय. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, एआयच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आपण करतोय. महिला शेतकरी धोरण आणण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना दोन्हींचा विचार केला तर आत्तापर्यंत राज्याने 57 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले हे लोकांना सांगितलं पाहिजे, असेही भरणेंनी म्हटले.
आंतरराष्ट्रीय कृषी बाजार
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणारे हे सगळे नेते आहेत, कालच एक निर्णय मोठा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. जयकुमार रावल साहेब इथे नाहीत मात्र पालघरमधील दापचेरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारला जाणार आहे, शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय आहे, काय सुविधा शेतकऱ्यांना पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी सत्कार होतील, मात्र हा घरातला सत्कार आहे, ज्याचा आनंद वेगळाच असतो, असे म्हणत दत्तात्रय भरणेंनी मुख्यमंत्र्याचं कौतुक करत शेतकऱ्यांचे आभार मानले.
हेही वाचा
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Comments are closed.