हळूहळू शासनाने लाडकी बहिण योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही – जयंत पाटील

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ई-केवायसी प्रक्रियेनंतर 80 लाख महिलांन लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. आता २ कोटी ४६ लाख लाभार्थ्यांपैकी फक्त १ कोटी ६६ लाख पात्र महिलांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ”काही दिवसात अशा प्रकारे महिलांना अपात्र ठरवत सरकारने लाडकी बहिण योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही”, असे पाटील म्हणाले आहे. त्यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे.

”लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे. देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही. शासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती”, असे जयंत पाटील म्हणाले.

Comments are closed.