वांद्र्यातील अतिक्रमणविरोधी मोहिमेत मशिद पाडल्याचा बदला घेणार होते; दहशतवाद्यांनी आखलेला हादरवण

मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील वांद्रे स्टेशनजवळील गरीब नगर येथील अनधिकृत बांधकामे (Bandra Demolition) पाडण्यासाठी 19 ते 23 मे दरम्यान मोहिम राबवण्यात आली होती. यादरम्यान, दगडफेकीच्या घटना घडल्या, ज्यात पोलिसांसह 10 जण जखमी झाले होते. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करुन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र यादरम्यान, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वांद्रे गरीब नगर येथील अनधिकृत मशिद पाडल्याचा बदला घेण्यासाठी एक कट रचला जात होता. यामध्ये दहशतवाद्यांकडून मुंबई पोलीस आणि सुरक्षा संस्थांवर दहशतवादी हल्ले केला जाणार होता. यासाठी दिल्लीसह चार शहरांतील ठिकाणांची रेकी देखील केली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी केली. दिल्ली पोलिसांकडून 4 राज्यांतून 9 दहशतवाद्यांना 30 मे रोजी अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली.

नेमकं प्रकरण काय? (Mumbai Crime News)

दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणलेल्या पाकिस्तान-समर्थित आयएसआयच्या एका दहशतवादी मॉड्यूलच्या सदस्यांनी, वांद्रे येथील गरीब नगर भागातील बेकायदेशीर मशीद नुकत्याच झालेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पाडल्याचा बदला घेण्यासाठी मुंबईतील पोलीस आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे नियोजन केले होते, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, एका नेपाळी नागरिकासह आठ संशयित सदस्यांना आम्ही अटक केली आहे. हे सदस्य दिल्ली आणि इतर शहरांमधील महत्त्वाच्या आस्थापना, सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे नियोजन करत असल्याचा आरोप आहे.

काही परदेशी नागरिकांचाही समावेश- (Mumbai Crime News)

दिल्ली पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. हे आरोपी दिल्ली, मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने आले होते. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील आहेत. यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अटक झालेल्या व्यक्तींचे मुंबई अंडरवर्ल्डशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. हे सर्व जण पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या इशाऱ्यावर हल्ले करण्यासाठी आले होते, असा आरोप आहे. त्यांच्याकडून ग्रेनेड आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Vasai Cyber Fraud : धक्कादायक! थेट न्यायाधीशांच्या पत्नीला सायबर चोरांनी घातला गंडा; ‘ऑफिसर कोड’ टाकताच बँक खातं रिकामं

आणखी वाचा

Comments are closed.