मुख्यमंत्री सर्व समाजाच्या हक्काचे रक्षण करण्यास सक्षम! भुजबळांच्या वक्तव्यावर गोरेंचा टोला
जयकुमार गोरे : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) हे सर्व समाजाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. कोणी कितीही डावप्रती डाव केले तरी ते पलटून लावू शकतात. त्यामुळे या विषयावर अधिक बोलणे गरजेचे नाही अशा शब्दात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मंत्री छगन भुजबळांच्या वक्तव्याला फटकारले. आज सांगोला येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांबाबत होत असलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री हे मराठा समाजासोबतच ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करण्यास समर्थ
कोणी काय बोलावे हे ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी कोणाला काय मेसेज द्यायचा आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्री हे मराठा समाजासोबतच ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करण्यास समर्थ आहेत. त्यांनी ते वारंवार सांगितले आहे. कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुख्यमंत्र्यांनी अशी अनेक संकटे परतवून लावली आहेत असे गोरे म्हणाले. मुख्यमंत्र्यावर करण्यात आलेले डावखेडाव उलटवले आहेत. त्यामुळं त्याची चिंता करण्याची गरज नसल्याचा टोलाही भुजबळ यांचे नाव न घेता गोरे यांनी लगावला.
ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही
जयकुमार गोरे हे मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या मंत्री समितीचे सदस्य आहेत. मात्र ज्या पद्धतीने मंत्रिमंडळात राहूनही भुजबळ मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत त्याला आज गोरे यांनी उत्तर दिले. मराठा समाजाच्या हिताचे रक्षण करताना ओबीसींच्या हक्काचे रक्षणही करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
नेमकं काय म्हणाले होते छगन भुजबळ?
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना नेहमी म्हणतात की, ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे. यावरून भुजबळ यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. भुजबळ म्हणाले की, 2 सप्टेंबरला एक जीआर काढला. माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे. जातीचं. 3 ऑक्टोबर 2025 ला सकाळी अर्ज केला. त्याच दिवशी 3 तारखेला संध्याकाळी जातप्रमाणपत्र मिळालं. अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात. एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी. अनेक सर्टिफिकेट चेक केले? मी सीएम साहेबांना सांगितलं. मी महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं. म्हटलं एवढे फास्ट अधिकारी या देशात कसे जन्माला आले. आम्हाला दहा महिने लागतात. यांना दहा तासात. हे थांबवलं नाही ना, लक्षात ठेवा. तुम्ही सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे. हा डीएनए कधी सरकेल काही सांगता येत नाही असा इशारा भुजबळांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
या लोकांना छगन भुजबळचा इतिहास माहीत नाही, शिवसेना सोडल्यानंतर असे अनेक आव्हान पचवलं : छगन भुजबळ
आणखी वाचा
Comments are closed.