जेजुरी गडावर रंगला आंबा महोत्सव, १५१ डझन आंब्यांनी सजले खंडोबा मंदिर
साऱ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात आज गुरव, कोळी, वीर, घडशी पुजारी समाज संघटना व मार्तंड देवसंस्थानच्या वतीने १५१ डझन आंब्याची सजावट करण्यात आली.
आज रविवार असल्याने खंडोबा गडावर हजारो भाविकांची गर्दी होती. आंब्याचा सुगंध गाभाऱ्यात सर्वत्र दरवळत होता. उद्या अन्नछत्रामध्ये या आंब्याचा आमरस करून भाविकांना देण्यात येणार आहे. आज करण्यात आलेल्या आंबा महोत्सवासाठी श्री मार्तंड देव संस्थानचे मुख्य विश्वस्तॲड विश्वास पानसे व विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे उपस्थित होते.
Comments are closed.