जीतन मांझी यांच्यावर सध्या दिल्लीत उपचार सुरू आहेत.

प्रकृती पुन्हा खालावली

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

बिहारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे सर्वेसर्वा जितन राम मांझी यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. बुधवारी त्यांना पाटण्यातील एका खासगी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते, परंतु त्याच रात्री त्यांची प्रकृती अचानक पुन्हा बिघडल्यामुळे आता त्यांच्यावर दिल्लीतील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना दिल्लीला नेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांचे कुटुंबीय गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी त्यांच्यासोबत दिल्लीसाठी रवाना झाले. त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे. दिल्लीत त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत. जितन राम मांझी यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली असून त्यांना व्हायरल तापाचाही त्रास जाणवत आहे. जितन राम मांझी यांच्यासोबत त्यांचे पुत्र संतोष सुमन, सून, मुलगी आणि जितेंद्र मांझी हे दिल्लीला रवाना झाले आहेत.

Comments are closed.