Telangana Forest Minister Konda Surekha removed
वृत्तसंस्था/हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी कोंडा सुरेखा यांना तात्काळ प्रभावाने मंत्रिमंडळातून हटवण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे. राज्याच्या वन आणि देवस्थान मंत्री असलेल्या कोंडा सुरेखा यांच्या कन्येने मुख्यमंत्री आणि पक्षाच्या इतर नेत्यांवर केलेल्या तीव्र टीकेनंतर मंत्रीमहोदया वादात सापडल्या होत्या. कोंडा सुरेखा यांच्या कन्येने केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सुरेखा यांना हटवण्याचा निर्णय राज्य काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने घेतला. आपल्यावरील कारवाईनंतर सुरेखा यांनी पुन्हा पक्ष आणि सरकारवर टीका केल्याने जोरदार शब्दयुद्ध सुरू झाले आहे.
Comments are closed.