पवारसाहेब नेता बनवणारी फॅक्टरी, त्यांनी सांगितलं तर हिमालयावरुनही उडी मारेल : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र owhad: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे गळतीला घाबरतात असे मला वाटत नाही. 1980 साली 60 आमदार निवडून आणले होते, त्यातले 58 गेले होते. साहेब हे नेता बनविणारी फॅक्ट्री असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

माझी भुमिका ही साहेबांनी हिमालयावरुन उडी मारायला सांगितली तरी मी मारेन असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्यावर माझ्याशी कुणी बोलले नाही त्यामुळे अशी कुठलीही चर्चा होते आहे असे मला वाटत नाही. पण अशी कुठलीही चर्चा सुरू असल्याचे मला माहीती नाही असे आव्हाड म्हणाले. उत्तमराव जाणकर यांनी त्यांची भावना बोलून दाखवली हाच त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. ते सगळी मोकळीक देतात. तुम्हाला मत मांजता येते. फ्रंटलच्या लोकांनी उलट त्यांचे प्रेझेंटेशन देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या काही नव्या नियुक्त्या करण्याचा प्रश्न नाही असेही आव्हाड म्हणाले.

पक्षाच्या आगामी उपक्रमांसाठी आणि निवडणूक रणनीतीसंदर्भात विस्तृत चर्चा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची राज्यस्तरीय बैठक आज मुंबई येथे संपन्न झाली. यानंतर आव्हाड बोलत होते. या बैठकीत पक्षाच्या आगामी उपक्रमांसाठी आणि निवडणूक रणनीतीसाठी विस्तृत रूपरेषा ठरविण्यात आली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या बैठकीला राज्यभरातून वरिष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या बैठकीत  पक्षातील नवचैतन्य व एकोप्याचे दर्शन घडले असेही तपासे पुढे म्हणाले.

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची गरज

जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तातडीची रणनीती स्पष्ट केली आहे. त्यांनी सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील यंत्रणांना बुथस्तरावर बळकट करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात विविध शासकीय कार्यालयांमध्ये चाललेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडावी असे आवाहन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्याचे तपासे म्हणाले.

पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी संपूर्ण राज्यभर लवकरच दौरे करणार

पक्षातील नवीन पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने, पक्ष युवक व महिला आघाड्यांचे बळकटीकरण करणार आहे व नवोदित व उत्साही स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी करून घेतले जाणार आहे असेही जयंत पाटलांनी नमूद केले. पक्षातील वरिष्ठ पातळीवरील नेते मंडळी संपूर्ण राज्यभर लवकरच दौरे करणार आहेत व जिल्हा तालुका स्तरावरील पक्ष संघटनेचा व शासकीय स्तरावरील  योजनांचा आढावा घेणार असेही श्री जयंत पाटील यांनी सांगितल्याचे तपासे म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांमधील बेरोजगारी आणि जनतेच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या बैठकीत श्री. जयंत पाटील यांनी पक्ष संघटनेत आवश्यकतेप्रमाणे फेररचनेचे संकेत दिले. नव्या जबाबदाऱ्या, नव्या नियुक्त्या व आवश्यकतेनुसार पुनर्रचना करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात येईल असेही श्री पाटील पुढे म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

महत्वाच्या बातम्या:

जशी चाणक्य नीती आहे तशी पवार नीती! शरद पवार-अजित पवार एकत्र असल्याचे माझ्याकडे पुरावे, नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

अधिक पाहा..

Comments are closed.