सनातन धर्म विकृत, भारताचं वाटोळं केलं, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य; भाजपकडून टीकेची झोड
जितेंद्र owhad: काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj Chavan) यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व सातही आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर चव्हाण यांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ नव्हे तर ‘सनातनी दहशतवाद’ असं म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया दिली होती. या विधानानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली . दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आहे,” असे वक्तव्य केले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. सनातन धर्माने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. सनातन धर्मियांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करून टाकलं. सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत, हे म्हणायला कोणीच घाबरायला नको, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल : जितेंद्र आव्हाड
यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर देखील पोस्ट केली आहे. त्यात म्हटलंय की, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.
होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे…
भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते.
चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते.
बसवेश्वरांना मारणारे… pic.twitter.com/znuxn4kpf0
या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल. जोपर्यंत जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर म्हटले आहे.
भाजपकडून टीकेची झोड
दरम्यान, आव्हाडांच्या या विधानावर भाजपा आमदार राम कदमांनी टीका केली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी सर्व आयुष्य हिंदू धर्मासाठी दिलं. कोणाला खूश करण्यासाठी ही विधानं करत आहात. श्रावणचा महिना आहे. हिंदू समाज अनुष्ठान करतोय. त्यांच्या भावना दुखवण्याचे काम करत आहात. गलिच्छ राजकारणासाठी हिंदू समाजाला बदनाम करताय. नैतिकतेच्या भूमिकेतून सनातन हिंदू धर्माची त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे म्हणत राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केलाय.
https://www.youtube.com/watch?v=ujsruksld20
आणखी वाचा
पृथ्वीराज चवनवरील प्रकाश महाजन: पृथ्वीराज चवन थिंक टँक सेप्टिक टँक, प्रकाश महाजनांच आवाज
आणखी वाचा
Comments are closed.