माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडिओ; जितेंद्र आव्हाडांनी उघडं पाडलं, स्कीप नव्हे तर गेम खेळतच ह
मणक्राव कोकेटे: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी गेम खेळतानाचे आणखी दोन व्हिडीओ समोर आणले आहेत. यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसून येत आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते, असा ठाम दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि यामध्ये कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान देखील आव्हाड यांनी दिले आहे.
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते.
आता मी… pic.twitter.com/pahlqjgwp2
आणखी किती पुरावे हवेत ते सांगा
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर म्हटले आहे की, एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे. प्रश्नोत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.