15000 धावा! जोस बटलरचा ऐतिहासिक टप्पा, ‘ही’ कामगिरी करत मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला टाकले मागे

सध्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका खेळली जात आहे. यामधील दुसरा सामना गुरूवारी (17 सप्टेंबर) कार्डिफ येथे खेळला गेला. यामध्ये इंग्लंडचा विकेटकीपर-फलंदाज जोस बटलरने 30 धावा केल्या आणि एका मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि कर्णधार हॅरी ब्रूकने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 विकेट्स गमावत 145 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने 6 विकेट्सने सामना जिंकला. यजमान संघाने 12.1 षटकांत 4 विकेट्स गमावतच लक्ष्य गाठले.
बटलरने ऍन्युरिन डोनाल्डच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली. डोनाल्ड 21 धावा करत बाद झाला, तर बटलरने 16 चेंडूंत एक षटकार आणि चार चौकार मारत 30 धावा केल्या.
बटलर 2009 पासून टी 20 क्रिकेट खेळत आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध 30 धावा करताच क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये इतिहास रचला. तो टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि 15000 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज कायरन पोलार्डला मागे टाकले आहे. पोलार्डने 671 डावांमध्ये 14999 धावा केल्या आहेत.
बटलरने 528 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 497 डावांमध्ये 15000 धावांचा जादुई आकडा गाठला. यामध्ये त्याच्या 9 शतके आणि 107 अर्धशतकांचा समावेश आहे.
टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले पाच फलंदाज
जोस बटलर – 15000
किरॉन पोलार्ड – १४९९९
ॲलेक्स हेल्स – 14591
ख्रिस गेल – 14562
डेव्हिड वॉर्नर – 14284
Comments are closed.