मुंबई इंडियन्स-आरसीबीला मिळाली गुड न्यूज! पण बाकी संघांना बसला दणका, आयपीएलमधून आणखी 3 खेळाडू ब

आयपीएल 2025 अद्यतनित बातम्या: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल 2025 पुढे ढकलण्यात आले होते, पण आता ते 17 मे पासून सुरू होत आहे. मोठी बातमी अशी आहे की, मायदेशात परतलेले अनेक परदेशी खेळाडू आता या लीगमध्ये सहभागी होण्यासाठी येत नाहीत. जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन आणि सॅम करन आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतात परतणार नाहीत. जेमी ओव्हरटन आणि सॅम करन चेन्नई सुपर किंग्जचा भाग होते आणि आर्चर राजस्थान रॉयल्स संघात होता. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

आरसीबी-मुंबईला मिळाली गुड न्यूज!

पण, दरम्यान आरसीबी आणि मुंबई इंडियन्सना चांगली बातमी मिळाली आहे. कारण जोस बटलर, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल 15 मे पर्यंत भारतात पोहोचतील. विल जॅक्स हा मुंबई इंडियन्ससाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. जेकब बेथेल, लिव्हिंगस्टोन हे आरसीबीचा भाग आहेत. तर जोस बटलर हा गुजरात टायटन्स संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. या हंगामात तिन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत.

पण, फिल सॉल्टबद्दल कोणतीही बातमी नाही. स्पर्धा थांबण्यापूर्वीच आरसीबीचा हा खेळाडू जखमी झाला होता, त्याच्या जागी बेथलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत होती. आता फिल भारतात येईल की नाही हे स्पष्ट नाही. जोफ्रा आर्चर परत न आल्याबद्दल राजस्थान रॉयल्सने म्हटले आहे की तो खेळाडू दुखापतग्रस्त आहे आणि दुखापतीतून बरा होत आहे. राजस्थान संघासाठी तो लवकरात लवकर तंदुरुस्त होणे सर्वात महत्वाचे आहे.

इंग्लंडचा आणखी एक मोठा खेळाडू मोईन अली परतणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे वडील मुनीर अली यांनी एका वेबसाइटला सांगितले की, मोईन अली पुढील 24 तासांत निर्णय घेतील. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले होते, आता ते 17 मे पासून पुन्हा सुरू होत आहे. प्लेऑफची लढाई 29 मे पासून सुरू होईल आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल.

हे ही वाचा –

India squad vs Eng Test Series : बीसीसीआयची डोकेदुखी संपली, रोहित शर्मा-विराट कोहलीच्या जागी दोन तगडे खेळाडू मिळाले; इंग्लंडविरुद्ध खेळणार?

अधिक पाहा..

Comments are closed.