मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदारांची नोंद, काँग्रेस आमदार ज्योती गायकवाडांचा आरोप


ज्योती गायकवाड: मुंबईत तब्बल 11 लाख दुबार मतदारांची नोंद झाली आहे, हे कुणासाठी? असा सवाल काँग्रेस आमदार डॉ ज्योती गायकवाड (ज्योती गायकवाड) यांनी केला आहे. मुंबई महापालिकेची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली आहे. या मतदार यादीत 11 लाखापेक्षा जास्त दुबार मतदार आहेत असे मत ज्योती गायकवाड यांनी व्यक्त केले.

पश्चिम उपनगरात 4 लाख 98 हजार 597 मतदारांची नोंद

ज्योती गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरात 4 लाख 98 हजार 597 मतदार आहे. पूर्व उपनगरात 3 लाख 29 हजार 216 मतदार आहेत. शहरात 2 लाख 73 हजार दुबार मतदार आहेत. काही ठिकाणी तर दोन पेक्षा जास्त वेळा मतदारांची नाव आहेत असे ज्योती गायकवाड म्हणाल्या. नगरसेवक निवडणुकीत अवघ्या काही मतांनी निवडणूक जिंकू शकते आणि हरू शकतो. 11 लाख मतदार दुबार आहेत हे कुणासाठी केलं? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे
याविरोधात लढायला काँग्रेस तयार असल्याचे आमदार डॉ ज्योती गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या, विरोधकांची मागणी

मतदार याद्यांमधील दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जात आहे. राज्यातील अनेक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर पंचायतींमध्ये सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. आधी करोना आणि मग आरक्षणाचा प्रश्न यामुळे निवडणुका रखडल्या. त्या 31 जानेवारी 2026 च्या आधी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

राज्यातील नगर पंचायती आणि नगरपरिषदांची रणधुमाळी सुरु

राज्यातील नगर पंचायती आणि नगरपरिषदांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यासाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. 1 कोटी 7 लाख मतदार या निवडणुकीत मतदान करतील. त्यांच्यासाठी 13 हजार 355 मतदान केंद्रं असतील. ईव्हीएमवरच निवडणूक होणार आहे. नवीन मोबाईल ऍपच्या मदतीने मतदारांना मतदान केंद्र आणि मतदार यादीतील नाव शोधता येईल.

राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना ही दुबार नावे शोधा व दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा, असे आदेश दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक बूथवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुबार मतदारांची नावे एका ठिकाणाहून हटवण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत. मात्र, दुबार मतदान कोणीही करू नये यासाठी आता वेळेवर काय करता येईल, याचा अभ्यास करून राज्य निवडणूक आयोगाने आदेशात असे म्हटले आहे की, ज्या-ज्या मतदारांची दुबार नावे आहेत त्यांची नावे शोधून काढा आणि ते एकाच ठिकाणी मतदान करतील, दोन ठिकाणी मतदान करणार नाहीत याची खातरजमा करा असे सांगण्याच आले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.