कळंबोलीत पाण्याची मीटर चोरणारी टोळी
कळंबोली वसाहतीतील सेक्टर ४, ५ आणि ६ परिसरात पाणी मीटर चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातून आतापर्यंत सुमारे ६० ते ७० पाणी मीटर चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय असून त्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत काही व्यक्ती गोणपाट घेऊन परिसरात फिरत असून पाणी मीटर चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. चोरीच्या घटनांमागे एकच टोळी कार्यरत आहे का, याचा तपास करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पाणी मीटरमधील पितळ व अन्य धातू भंगाारात विकण्यासाठी ही चोरी होत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी, तसेच परिसरातील रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Comments are closed.