भांडी खरेदीवरून वाद, कल्याणच्या कोळसेवाडीत दीड तास गोंधळ; मराठी ग्राहक अन् दुकानदारामध्ये राडा
कल्याण क्राईम न्यूज : कल्याणच्या कोळसेवाडीत्यामुळे भांडी खरेदीवरून वाद उफाळून आला आहे. अजय स्टील या दुकानात भांडी खरेदीवरून हा वाद बांधकाम झालाय. यात मराठी ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदार आमनेसामने (Kalyan Rada) आले असून शाब्दिक वाद थेट मारहाणी पर्यंत गेल्याचा दावा करण्यात आलाय. भांड्यांचा दर महाग असल्याने ग्राहक बाहेर पडताच अपशब्द व मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रहके स्त्रीकडून करण्यात आला आहे. दरम्यान सुमारे दीड तास महिलांचा गोंधळ चाललाय. फक्त दुकानदारांनी हे सर्व आरोप फेटाळले असून स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव शांत झाला.
Mumbai Crime : मुंबईच्या लोकलमध्ये वाद, मालाड स्टेशनवर शिक्षकाची भोसकून हत्या, 12 तासात आरोपीला बेड्या
मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारी घटना घडली होती. इथं एका प्राध्यापकाची भर रेल्वे स्थानकात धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. लोकलमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झालं होतं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे.
Mumbai Crime News : नेमकी घटना काय होती?
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती. यावेळी अलोक सिंग नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना, गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाशी धक्का लागला. या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेनं अलोक सिंग यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने सिंग यांच्या पोटात शस्त्र खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आलं. मात्र तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
Jalgaon Crime : सिनेस्टाईल पाठलागानंतर पाळधी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई48 लाखांचा गुटखा जप्त
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पाळधी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे मोठी कारवाई करत गुटख्याचा साठा वाहून नेणारा कंटेनर सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला. या कारवाईत 48 लाख 22 हजार 264 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा तसेच 25 लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण तब्बल 73 लाख 22 हजार 264 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक सुरू असल्याचे समजले. त्यानुसार पाळत ठेवण्यात आली. कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळ काढल्याने पोलिसांनी पाठलाग केला. अखेर पाळधी जवळील सावदे शिवारात कंटेनर पकडण्यात आला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये 128 गोण्या प्रतिबंधित गुटखा आढळून आला. अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी प्रदीप भाटू पाटील या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
https://www.youtube.com/watch?v=bsiLszA1s3k
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.