धक्कादायक! जामिनावर सुटलेल्या पेंद्या भाईला लग्नाआधीच संपवलं, मैत्रिणीवरही जीवघेणा हल्ला
कल्याण क्राईम न्यूज : कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली (कल्याण क्राईम न्यूज) आहे. कल्याणच्या आडीवलीत मध्यरात्री जुन्या वादातून पेंद्या भाईची चाकूने 12 ते13 वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मैत्रिणीवरही जीवघेणा हल्ला धाला आहे. हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाईचा अविनाश झा, गौरव उर्फ बॉम्बे आणि इतर चार साथीदाराने लग्नाआधीच केला खेळ खल्लास केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची विशेष पथके आरोपीच्या शोधात आहेत.
घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण
घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्जुन काळपांडे उर्फ पेंद्या भाई हा आपल्या ओळखीच्या तरुणीसोबत असताना काही हल्लेखोरांनी त्याला गाठले. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद काही क्षणांतच रक्तरंजित हल्ल्यात बदलला.आरोपींनी अर्जुनवर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे सांगितले जात आहे. तब्बल 12 ते 13 वार झाल्याने अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हल्ल्यावेळी अर्जुनसोबत असलेल्या तरुणीने बचाव करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही आरोपींनी वार केल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मृत अर्जुन काळपांडे हा यापूर्वी कल्याण पूर्वेतील संदीप राठोड हत्या प्रकरणात आरोपी होता.
चार महिन्यांनंतर त्याचे लग्न होणार होते
काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. चार महिन्यांनंतर त्याचे लग्न होणार असल्याची माहिती समोर येत असतानाच त्याची हत्या झाली आहे. चार दिवसांपूर्वी मुख्य आरोपी अविनाश झा आणि गौरव उर्फ बॉम्बे यांच्यासोबत अर्जुनचा वाद झाला होता. याच वादाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पोलिसांकडून मात्र सर्व बाबींचा तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण शोधले जात आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अविनाश झा, गौरव उर्फ बॉम्बे आणि इतर साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Comments are closed.