कल्याण डोंबिवलीत भाजपचे 8 बिनविरोध, मनसेची माघार; बहुतमताच्या आकड्यासाठी हव्या एवढ्या जागा?

ठाणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने कल्याण डोंबिवली (KDMC) महानगरपालिकेतून विजयाचा शंखनाद फुंकला. येथील दोन प्रभागातून उमेदवार बिनविरोध विजयी केल्यानंतर भाजपने पहिल्या विजयाचा जल्लोष केला होता. त्यानंतर, रविंद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे, भाजपने केडीएमसीतून विजयाची हॅट्रिक केली होती, त्यानंतर आता तब्बल 8 उमेदवार भाजपचे बिनविरोध झाले आहेत. तर, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध आले आहेत.

रेखा चौधरी, आसावरी नवरे यांच्यानंतर, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्याने भाजपने केडीएमसी महापालिकेत तिसरा विजय मिळवला होता. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपच्या गुरुवारपर्यंत 5 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी दोन प्रभागात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजपचे एकूण 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. येथील प्रभाग 26 अ मधून मुकुंद पेडणेकर बिनविरोध झाले आहेत. तर, भाजपचे महेश पाटील प्रभाग 28 मधून बिनविरोध निवडून आल्याने भाजपचा 7 वा उमेदवार बिनविरोध आला आहे. महेश पाटील यांच्या बिनविरोध निवडीने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील प्रभागातून मनसेचे उमेदवार मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महेश पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मनोज घरत हे मनसेचे शहराध्यक्ष आहेत. तर, प्रभाग क्र. 19 (क) मधून भाजपा-महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध आले आहेत.

केडीएमसी महापालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 62 जागांची गरज असून महापालिकेच्या 122 जागा आहेत. त्यापैकी, भाजप-शिवसेना महायुतीने 12 जागा बिनविरोध केल्याने आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महायुतीला केवळ 50 जागांच्या विजयाची गरज आहे. त्यामुळे, भाजप-शिवसेना महायुतीने येथे मोठी आघाडी घेतली आहे.

भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

1.कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी

2.कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे

3.कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर

4.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील

5.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील

6.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २६ अ मधून भाजपचे मुकूंद पेडणेकर

7.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ मधून भाजपचे महेश पाटील

8.कल्याण-डोंबिवली – प्रभाग क्र. १९(क) मधून भाजपाचे साई शिवाजी शेलार

ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का

ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेने पहिलं खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक १८ मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री फाटक बिनविरोध विजयी झाल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रविंद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहा नागरे यांनी ऐनवेळी माघार घेतली.

हेही वाचा

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब; कुटुंब, पक्षाच्या नेत्यांसोबतही संपर्क नाही; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.