माजी भाजप आमदार नरेंद्र पवारांच्या ऑडिओ क्लीपमुळे भाजपतील वाद चव्हाट्यावर; नेमकं प्रकरण काय?
मुंबई: म्हाडाच्या प्रकल्पावरुन महायुतीत वाद सुरु असताना भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक ओडियो क्लीप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये भाजपचे माजी आमदार पवार हे एका महिलेशी बोलत आहे. या प्रकल्पात कपील पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असे त्या क्लीपमध्ये आहे. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी रहिवासियांसोबत पत्रकार परिषद घेतली. त्या दरम्यान ही ऑडिओ क्लीप सगळ्यांना ऐकविण्यात आली आहे.
या संदर्भात माजी आमदार पवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, एक महिला जी विरोधात जात होती. ती त्या बिल्डरची बाजू घेत होती. शिवसेना नेते गोपाळ लांडगे भांडत होते. ऑर्डर त्यांच्या विरोधात गेल्याने कपील पाटील बाळ माने हे टायकूनला मदत करीत असल्याचे मला रविंद्र चव्हाण यांनी काल सांगितले. ही ऑडिओ क्लीप कपील पाटील सगळ्यांना ऐकवित आहे. आमदारांना ही क्लीप कपील पाटील यांनी दिली असेल. कल्याणकरांचा विषय विधीमंडळात येऊ नये यासाठी हे सगळे फिरत होते मी साक्षीदार असल्याचे स्पष्टीकरण नरेंद्र पवार यांनी दिले आहे. म्हणजे नरेंद्र पवार यांनी आपल्या पक्षातील माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील गंभीर आरोप केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही कथित ऑडिओ क्लीप सगळ्यांना ऐकवली. या संदर्भात माजी आमदार पवार यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितेल की, एक महिला जी विराेधात जात होती. ती त्या बिल्डरची बाजू घेत होती. शिवसेना नेते गोपाळ लांडगे भांडत होते. ऑर्डर त्यांच्या विरोधात गेल्याने कपील पाटील, बाळ माने हे मदत करीत असल्याचे मला रविंद्र चव्हाण यांनी काल सांगितले. ही ऑडिओ क्लीप कपिल पाटील सगळ्यांना ऐकवत आहेत. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची एक क्लीप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये भाजपचे माजी आमदार पवार हे एका महिलेशी बोलत आहे. या प्रकल्पात कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी माझी लढाई आहे असा दावा पवार यांनी या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.