आमच्याकडे काय बघतो म्हणत जबर मारहाण; बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकुने हल्ला

ठाणे : कल्याण शहरातील मच्छी मार्केट परिसरात फरदीन शेख या विद्यार्थ्यावर (Student) प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमच्याकडं काय बघतोस? असा जाब विचारत दोन तरुणांनी विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली असून मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एक अल्पवयीन आहे. पोलिसांनी (Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे संबंधित युवकांकडून परिसरात दहशत पसरवण्याच्या घटना सातत्याने केल्या जात आहेत.

कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात राहणारा फरदीन शेख हा शाळकरी विद्यार्थी आपल्या लहान बहिणींला शाळेत सोडून घरी परत येत असताना दोन तरुणांनी त्याची दुचाकी अडवली. तू आम्हाला काय बघत होता असे बोलत या तरुणांनी फरदीनला मारहाण केली. फरदीन घरी आला आणि आपल्या एका मित्रासोबत मारहाण करणाऱ्या तरुणाच्या घरी गेला. तिथे फरदीनने त्यांना विचारले की मला का मारहाण केली? त्यावर या तरुणांना एवढा राग आला की जवळ असलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या जवळील चाकूने फरदीनवर प्राणघातक हल्ला केला. त्याचा दुसरा भाऊ काईद देखील त्याला मारहाण करीत होता.  क्षुल्लक वादातून हा प्रकार घडला असून मारहाण करणाऱ्यांपैकी एक तरुण अल्पवयीन आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलेच्या घरात घुसून धिंगाणा

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणांची परिसरात दहशत असून ते वारंवार नागरिकांना त्रास देत असतात. यापूर्वीही किरकोळ कारणांवरून वाद घालण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या घरात घुसून, त्यात तिच्या घरात देखील या तरुणांनी धिंगाणा घातला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा

हिंदीसक्ती, दावोस, टिपू सुलतान ते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था; विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं दोन तास भाषण, सगळंच काढलं

आणखी वाचा

Comments are closed.