NEET परीक्षा रद्द झाल्याबद्दल कमल हासन यांनी व्यक्त केला संताप; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले..
Neet च्या ३ मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपरफुटी झाल्याच्या आरोपांनंतर, एनटीएने ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर नाराजी व्यक्त करत कमल हासन यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पेपरफुटीच्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) नीट (यूजी) 2026 परीक्षा रद्द केली आहे. या निर्णयावर अभिनेते कमल हासन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यावर विपरीत परिणाम झाला आहे, असे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
NEET प्रवेश परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या २२ लाख विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्ने गुन्हेगारी टोळ्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. या मानसिक त्रासाला जबाबदार कोण?
आतापर्यंत मला एकही NEET परीक्षा गैरव्यवहाराच्या तक्रारीशिवाय झाल्याचे आठवत नाही. यामुळे शिक्षण…
— कमल हासन (@ikamalhaasan) १२ मे २०२६
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नीटसारख्या महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेची रात्रंदिवस तयारी करणाऱ्या 22 लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने गुन्हेगारी कटांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. या मानसिक आघाताची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. कमल हासन यांनी पुढे असेही म्हटले की, कोणतीही नीट परीक्षा वादाशिवाय पार पडलेली नाही. त्यामुळे, शिक्षण पुन्हा राज्य सूचीमध्ये समाविष्ट करण्याची त्यांनी सातत्याने मागणी केली आहे. या भ्रष्ट प्रक्रियेपासून आणि या अशा प्रवृत्तीपासून हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. असे वृत्त एनडीटीव्ही ने दिले आहे.
सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असून, लवकरच परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल. दिल्लीसह देशाच्या अनेक भागांतील विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावर सरकार आणि एनटीएने याबाबत उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. ही परीक्षा हिंदुस्थानातील 551 शहरांमध्ये आणि 14 परदेशी शहरांमध्ये घेण्यात आली होती.
Comments are closed.