शिवसेना कांजूर शाखा क्रमांक 117 च्या वतीने दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना कांजूर शाखा क्रमांक 117 च्या वतीने दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका श्वेता पावसकर यांनी आयोजित केलेल्या सराव शिबिरात 40 गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. सात थर रचून हंडी फोडणाऱ्या छत्रपती गोविंदा पथकाला सुनील राऊत यांच्या हस्ते चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बाबा कदम, दीपक सावंत, सिद्धी जाधव, रवींद्र महाडिक, दीपाली पाटील, विजय तोडणकर, तानाजी मोरे, सुमन म्हसकर आदी उपस्थित होते.

Comments are closed.