अभिनेत्रीच्या घरात तरुणानं आयुष्य संपवलं, लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह; ‘ती’ कुठे होती?

कन्नड अभिनेत्री कृषी थापांडा प्रकरण: अभिनेत्री कृषि थापंडा ( Krishi Thapanda) सध्या भयानक कारणामुळे चर्चेत आहे.  कर्नाटकची राजधानी बंगळूरूमधील आरआर नगर परिसरात अभिनेत्रीच्या राहत्या घरात  45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच खळबळ उडाली आहे.  मृत व्यक्तीची ओळख पटली असून, वैशाख उपाध्याय  असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैशाकच्या पश्चात पत्नी आणि 14 वर्षांचा मुलगा असल्याची माहिती आहे. दरम्यान, वैशाकचा मृतदेह अभिनेत्री कृषिच्या घरात कसा आढळला? नेमकं घडलं काय? याचा तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू (Kannada Actress Krishi Thapanda Vaishakh Death Case)

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बुधवारी (24 जून) रोजी उघडकीस आली.  ही घटना रात्री उशिरा समोर आली. बंगारप्पा गुड्डा जवळील एलिगेंट टेरेसच्या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये वैशाखचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.  या घटनेची माहिती मिळताच आरआर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली.

अभिनेत्रीच्या घरी मृत व्यक्ती नेमकं का गेला होता? (Vaishakh Upadhyay Death in Krishi Thapanda House)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात बरेच चढ उतार सुरू होते. त्याच्या जीवनात शांतता नव्हती, अशी माहिती होती.  बिझनेसमॅन एव्हीआर रेड्डीकडून दाखल झालेल्या तक्रारीनंतर  मृत वैशाख  आणि त्याची  पत्नी दोघांमध्ये वाद विवाद सुरू झाले होते. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अशांतता निर्माण झाली होती.  वैवाहिक अशांतता निर्माण झाली असल्यामुळे वैशाख बऱ्याचदा  कृषि थापंडाच्या घरी जात असल्याची माहिती आहे.

24 जून रोजी कृषिच्या घरात नेमकं काय घडलं? (Krishi Thapanda Vaishakh Death Case)

मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी 24 जून रोजी देखील वैशाक कृषिच्या घरात गेला होता. खरंतर,  यापूर्वी वैशाकला बिझनेसमॅनला धमकी दिल्याप्रकरणी अटक झाली होती.  यानंतर या प्रकरणाची नोंद एचएएल पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती आहे.  दरम्यान, जेव्हा हे प्रकरण घडलं, तेव्हा अभिनेत्री घरात उपस्थित नव्हती. कृषि तेव्हा  मेहादेवपुरा येथील  क्षेमवनमधील एका मेडीटेशन प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी गेली होती. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसूतीत वेदनेनं विव्हळत होती ‘ईठा’, पण तरीही.. अंगावर काटा आणणारा टीझर पाहून लेकीची भावुक पोस्ट

Comments are closed.