करण दर्डा यांची INS अध्यक्षपदी नियुक्ती
वार्षिक सभेत निवड : डॉ. किरण ठाकुर कार्यकारिणीवर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘द इंडियन न्यूजपेपर सोसायटी’च्या (आयएनएस) अध्यक्षपदी लोकमत वृत्तपत्र समूहाचे करण राजेंद्र दर्डा यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड 2026 ते 2027 या एका वर्षासाठी आहे. ते मावळते अध्यक्ष विवेक गुप्ता (सन्मार्ग) यांचे स्थान घेत आहेत. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ती करण्यात आली. ‘दै. तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांची निवड संस्थेच्या कार्यकारिणीवर करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
तन्मय माहेश्वरी (अमर उजाला) यांची नियुक्ती संस्थेचे उपाध्यक्ष (डेप्युटी प्रेसिडेंट) म्हणून तर हर्ष मॅथ्यू (वनिथा) यांची नियुक्ती व्हाईस प्रेसिडेंट म्हणून करण्यात आली आहे. अनंत नाथ (गृहशोभिका) यांची नियुक्ती संस्थेच्या मानद कोषाध्यक्षपदी (ऑनररी ट्रेझरर) करण्यात आली आहे. संस्थेची 87 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी 7 सप्टेंबर 2026 या दिवशी पार पडली आहे. मेरी पॉल या संस्थेच्या महासचिव आहेत. त्यांनी निवेदनाद्वारे सभेची माहिती दिली.
41 माननीयांची कार्यकारिणी
एस. बालसुब्रमणियन आदित्यन (दै. थंथी), गिरीश अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), समाहित बाल (प्रगतीवादी), समुद्र भट्टाचार्य (हिंदुस्थान आणि हिंदुस्थान टाईम्स, दिल्ली), होर्मुसजी एन. कामा (बाँबे समाचार), गौरव चोप्रा (फिल्मी दुनिया), विजय कुमार चोप्रा (पंजाब केसरी, जालंदर), डॉ. विजय जवाहरलाल दडौ (लोकमत, नागपूर), जगजीतसिंग दर्दी (चऱ्हदीकला दैनिक), पल्लवी एस. धेंपे (द नवहिंद टाईम्स), विवेक गोयंका (द इंडियन एक्स्पे्रस, मुंबई), महेंद्रमोहन गुप्ता (दैनिक जागरण), प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण, वाराणसी), शैलेश गुप्ता (मिड-डे), शिवेंद्र गुप्ता (बिझनेस स्टँडर्ड), योगेश पी. जाधव (मराठी ), राजेश जैन (न्यू इंडिया हेराल्ड), सरविंदर कौर (अजित), विलास ए. मराठे (दैनिक हिंदुस्थान, अमरावती), ध्रुब मुखर्जी (आनंदबझार पत्रिका), पी. व्ही. निधीश (बालभूमी), जान्हवी अभिजित पवार (सकाळ, पुणे आणि नवी मुंबई, तसेच महाराष्ट्र हेराल्ड, पुणे), राहुल राजखेवा (द सेंटिनेल), आर. एम. आर, रमेश (दिनकरन), अतिदेब सरकार (द टेलिग्राफ), अमाम एस. शाह (गुजरात समाचार, बडोदा आणि सुरत), सौभाग्यलक्ष्मी कानेकल टिळक (मौर्या), बिजू वर्घिस (मंगलम प्लस), आय. वेंकट (ईनाडू), कुंदन आर. व्यास (व्यापार-जन्मभूमी), किरण बी. वडोदरीया (वेस्टर्न टाईम्स), सोमेश शर्मा (राष्ट्रदूत साप्ताहिक), जयंत मम्मेन मॅथ्यू (मलयाल मनोरमा), एल. आदीमूलम् (हेल्थ अँड द अँटीसेप्टिक), मोहित जैन (इकॉनॉमिक टाईम्स), के. पी. आर. रे•ाr (साक्षी), राकेश शर्मा (आज समाज), एम. व्ही. श्रेयांश कुमार (मातृभूमी) आणि विवेक गुप्ता (सन्मार्ग).
Comments are closed.