Met Gala 2026 मध्ये करण जोहरची एन्ट्री; पेहरावर राजा रवी वर्मा यांच्या कलेची छाप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026) मध्ये हिंदुस्थानी परंपरा आणि हस्तकलेची झलक दिसेल असा पेहराव करून पदार्पण केले. प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राने तयार केलेल्या विशेष पोशाखात त्याने राजा रवी वर्मा यांच्या कलाकृतींमधून प्रेरणा घेतल्याचे पाहायला मिळत होते. न्यूयॉर्कमधील या कार्यक्रमाची थीम ‘कॉस्च्युम आर्ट’ आणि ड्रेस कोड ‘फॅशन इज आर्ट’ (Fashion is Art) ला अनुसरून होती.

‘फ्रेम्ड इन इटरनिटी’ (Framed in Eternity) असे नाव असलेल्या या पोशाखात जोहरने एक स्ट्रक्चर्ड, पॉवर-शोल्डर विंटेज जॅकेट परिधान केले होते. या जॅकेटवर जवळपास सहा फूट लांब हाताने पेंट केलेले ‘केप’ (cape) होते. अत्यंत बारकावे असलेल्या या केपची निर्मिती ८० हून अधिक कारागिरांच्या पथकाने ८५ दिवसांत केली होती.

‘Tyaani’ या ज्वेलरी ब्रँडचा खड्यांचा हार आणि अंगठ्या घातल्या होत्या. करणने आपल्या इन्स्टाग्रामवर हँडलवरून Met Gala मध्ये कशाप्रकारे पदार्पण याची झलक शेअर केली.

‘मनीषसोबत काम करताना कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज भासत नाही. आम्ही इतके दिवस एकत्र काम केले आहे की आम्हाला एकमेकांच्या कामाची समज आहे. मला माहित होते की मी Met Gala मध्ये सहभागी होणार असेल तर ते त्याच्यासोबतच पदार्पण करायला हवे’, असे करण जोहरने सांगितले.

या पोशाखात रवी वर्मा यांच्या ‘लेडी विथ द पीच’, ‘हंसा दमयंती’, ‘कादंबरी’, ‘अर्जुन आणि सुभद्रा’ आणि ‘देअर कम्स पापा’ यांसारख्या काही अत्यंत प्रसिद्ध कलाकृतींचे संदर्भ समाविष्ट करण्यात आले होते.

Comments are closed.