५० खासदार आज घारापुरी बेटावर केंद्रीय समितीचा अभ्यास दौरा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असलेल्या घारापुरी बेटाला ५० खासदार उद्या मंगळवारी भेट देणार आहेत. एलिफंटा बेटावरील ग्रामपंचायतीचा ग्रामीण विकास व पंचायत राज संसदीय स्थायी समिती हा अभ्यास दौरा आहे. यानिमित्ताने स्थानिकांच्या समस्या सोडवण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

उरण तालुक्यातील घारापुरी हे येथील काळ्या पाषाणातील कोरीव शिवलेण्यांमुळे जगप्रसिद्ध आहेत. या ठिकाणाला युनोस्कोने वल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. त्यामुळे घारापुरी बेटावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशविदेशातील पर्यटक येत असतात. मात्र बेटावर पर्यटक तसेच स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बेटावर येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडून विविध विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला.

या दौऱ्यात स्थानिक समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पुरातत्त्व विभागाकडून घारापुरी बेटावरील केलेल्या उत्खननात येथील व्यापार आणि संस्कृती यांचा उलगडा झाला आहे. यामध्ये दीड हजार वर्षांपासून घारापुरी बेटाचे स्थान आणि त्याचे महत्त्व उजेडात आलेले आहे. त्यामुळे मंगळवारी आयोजित संसदेच्या स्थायी समितीचा अभ्यास दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Comments are closed.