पुण्यात दोन भीषण अपघात, अंगावरून टेम्पो गेल्यानं पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी, दुसऱ्या घटनेत
पुणे : पुण्यातील तळेगाव आंबी परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असून आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा (Pune Accident News) जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. जखमी पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(Pune Accident News)
या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची बाबही समोर आली असून वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी आंबी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला टेम्पो चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(Pune Accident News)
Pune Accident News: वडगाव मावळमध्ये चालकाला होरपळून मृत्यू
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथे उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहनाला अचानक आग लागून वाहनातील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्री साधारण दीडच्या सुमारास घडली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस आणि वडगाव मावळ अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. चालकाला वेळेत बाहेर पडता न आल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. हा अपघात मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर घडला असून, घटनेचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत.
Pune Accident News: भोरमध्ये एसटीच्या धडकेत कारचा चुराडा, एकाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील भोर येथील रामबाग रस्त्यावर एसटी बस आणि इको कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून इतर काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघाताबाबत भोर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.